नवी मुंबईतील महिलांचा स्त्युत्य उपक्रम; अनिष्ठ" प्रथा बंद करण्याची मागणी
तळोजा/ विकास पाटील : आगरी समाजातील अशा कीतीतरी “अनिष्ठ” प्रथा,चालीरीती,रूढी परंपरा आहेत. ज्याने समाज उध्वस्त होत चालला आहे. समाज अध:पतना कडे वाटचाल करत आहे. तेव्हा माणसाच्या जीवावर बेतनाऱ्या प्रथा बंद करण्यासाठी खारकोपर ( गव्हाण कोपर ) येथील महिला भगिनींनी पुढाकार घेतला आहे. त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असले तरी त्यांना गावातील प्रतिष्ठीत मंडळी खोट्या प्रतिष्ठेसाठी विरोध करीत असल्याचे दिसून येत आहे.
प्रथा, चालीरीती, रूढी या पुर्वीपासून चालत आलेल्या आहेत.मात्र दोन दशकांपासून त्यांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून येतो. आणि, तो बदल आम्हीच केवल पत,प्रतिष्ठेपायी घडवून आणला आहे. अतिशय गरीबीत हलाखीचं जिवन कंठणारा आगरी, कोळी, करडी समाज जसा हळुहळू सुशिक्षीत होऊ लागला,तसं त्याचं राहाणीमानही उंचावत गेलं. मात्र त्याच्यात पाहिजे तितका सुसंस्कृतपणा आला नाही. शिक्षणामुळे का होईना पण थोड्याफार प्रमाणात हा समाज नोकरी किंवा कामाधंद्याला लागला. जमिनीचा पैसा आल्याने साखरपुडे, हळदी- लग्न, मुला मुलींना बघण्याचे कार्यक्रम, पाचवी, बारसे, सण, उत्सव,यात्रा,जत्रा,मुंज जल्लोषात करण्याचा जो घाट घातलाय तो समाजाला कर्जात लोटणारा आहे. आता तर त्यात चक्क स्पर्धाच सुरू झालीय. त्यात आता “ओटी भरणा” वाढदिवस,आणखीन जावयांना बोलवून काय ते पुजाअर्चा करून,औक्षण केले जाते. या अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींची भर पडत आहे. आणि समाज कर्जबाजारी होण्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे समाजातील काही अनिष्ठ रुढी परंपरांविरोधात एकत्र येत पनवेमधील महिलांनी चुकीच्या प्रथा बंद व्हाव्यात यासाठी पुढे आल्या आहेत.
‘त्या’ युवकाचा खून करणाऱ्या तिघांना बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले
गेल्या दहा बारा वर्षापूर्वी लोकनेते खासदार दि बा पाटील यांनी अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. हळदी, साखरपुडा, लग्न हे कार्यक्रम एकाच दिवसात करण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यात त्यांना यश ही आले होते. पण त्यांच्या जाण्याने गेली चार पाच वर्षापासून या अनिष्ठा प्रथा पुन्हा जोरात सुरू करण्यात आल्या असून त्यावर करोडो रुपये खर्च होत आहेत.यासाठी आमदार खासदार,मंत्रीमहोदय,स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतीनीधी यांच्या सहकार्याने चार जिल्ह्यांचा मध्यवर्ती ठिकाणी मेळावा भरवून त्या व्यासपिठावरून आगरी, कोळी करडी समाजातील रुढी,परंपरा,सण,उत्सव,लग्न समारंभ,आणि अशा सर्वच प्रथांना लगाम घालण्यासंदर्भात कींवा त्या थोडक्यातच (नियमांच्या चौकटीत राहूनच खर्च करुन) साजऱ्या कराव्यात.
या कायदे, नियम,अटि-शर्तींच्याअधीन राहून कींवा त्यांचं पालन करुनच साजरा करण्याची मुभा असेल असे बंधन असणे गरजेचे आहे. तसा ठराव संमत करून त्यावर चारही जिल्हा प्रतीनीधींच्या स्वाक्षऱ्यांसह तो समाजात रुढ करावा,जेणेकरून समाजाचं होणारं अध:पतन थांबेल,आणि समाज विवीध क्षेत्रात गरुडझेप घेईल.