संभाजीनगर : तब्बल 15 दिवसांची प्रदीर्घ रजा घेऊन गेल्या आठवड्यात परतलेल्या पावसाने श्रावण सरींची दमदार हजेरी (Rain News) लावली. पण दोन दिवसांपासून ढगांचा पुन्हा लपंडाव सुरू झाला आहे. त्यामुळे उकाडा (Sun Light) वाढल्याने नागरिक पुन्हा हैराण झाले आहेत. पावसाने दडी मारल्याने शहरात पुन्हा उष्णता वाढू लागली आहे.
शनिवारी सकाळपासूनच सुरू झालेले चटके दिवसभर कायम होते. अधूनमधून आकाशात काळ्याकुट्ट ढग डोकावून पाहत होते. पण ते बरसत नसल्याने उकाडा आणखी वाढत आहे. ढग आणि पावसाने पुन्हा दडी मारल्याने शहराच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. हवामान खात्याने 33.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. जे सरासरीपेक्षा 2.4 अंशांनी जास्त होते.
किमान तापमान 23.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान खात्याने 30 ऑगस्टपर्यंत पावसाचा कोणताही इशारा दिला नाही. 30 ऑगस्टपर्यंत फक्त एक-दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता होती. दरम्यान, शहराचे कमाल तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचे संकेत विभागाने दिले आहेत.