मुंबई : “विनायक मेटें हे ( Vinayak Mete) माझे अत्यंत जवळचे मित्र होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ते नेते होते. त्यांचं अपघाती निधन हे मनाला चटका लावणारं आहे. अपघात झाल्यानंतर त्यांना लवकर मदत मिळाली नाही. मदत वेळेत मिळाली असती तर ते वाचू शकले असते. ही अत्यंत गंभीर बाब आहे”, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.
[read_also content=”साथीच्या आजाराने नागरिक हैराण! वातावरण बदलाचा परिणाम , रुग्णांना सोसावा लागतोय मोठा आर्थिक भुर्दंड https://www.navarashtra.com/maharashtra/as-a-result-of-climate-change-patients-have-to-bear-a-huge-financial-burden-nrab-315855.html”]
रविवारी पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. एक ते दोन तास त्यांना मदतच मिळाली नाही, असं चालकाने सांगितलं आहे. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ही गाडी कंटेनरला डाव्या बाजूने जोरदारपणे धडकली असं प्रथमदर्शनी कळत आहे. दरम्यान, विनायक मेटे यांचे पार्थिव जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे. याठिकाणी त्यांचे शवविच्छेदन केले जाईल.
[read_also content=”विनायक मेटे यांचं अकाली निधन मनाला वेदना देणारं, उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त https://www.navarashtra.com/latest-news/kokan/uddhav-thackeray-condoles-the-untimely-demise-of-vinayak-mete-nrps-315880.html”]
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज महत्वाची बैठक होती, त्या बैठकीसाठी ते मुंबईला निघाले होते. त्यांनी आज बीडमध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीसाठी फोन आल्यानं ते काल बीडहून मुंबईकडे निघाले होते.