पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारत-ब्राझील बिझनेस फोरमध्ये दोन्ही लुला दा सिल्वा यांनी नमूद केले की विकसनशील देशांमध्ये आतापर्यंतच व्यापार २.४ अब्ज डॉलर्स इतका होता. गेल्या वर्षी यामध्ये २५ टक्क्यांनी वाढ होत हा १५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला. परंतु आता दोन्ही देशांची क्षमता वाढली असून २०३० पर्यंत हा व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे लुला यांनी म्हटले.
भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ब्राझीचे समर्थन केले. तसेच त्यांनी ब्राझीलमधील नायबियम, लिथियम आणि लोहखनिज यांसारख्या नैसर्गिक संसाधनांबद्दल भाष्ट केले. भारताचे प्रगत तंत्रज्ञान आणि ब्राझीलची नैसर्गिक साधनसंपत्ती एकत्र आल्यास जागतिक पुरवठा साखळीला एक नवी दिशा मिळेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. खनिजांसाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने ही भागीदारी अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
या फोरममध्ये एरोस्पेस आणि खाणकाम क्षेत्रात भारत-ब्राझीलमध्ये अनेक महत्वपूर्ण करार करण्यात आले.
याशिवाय दोन्ही देशांमध्ये शेती, ऑटोमोबाईल्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी सहकार्य वाढविण्याचे निश्चित करण्यात आले. ब्राझीलच्या कंपन्या भारतीय स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणार असून यामुळे दोन्ही देशांतील तंत्रज्ञानिक सहकार्याला देखील चालना मिळणार आहे. दोन्ही देशांतील वाढता व्यापार जागतिक अर्थव्यवस्थेत विसनशील देशांचे प्रतिबिंब ठरणार आहे.
ग्लोबल साउथचा आवज बनणार भारत-ब्राझील; अध्यक्ष लुला एआय समिटसाठी दाखल, PM मोदींची घेणार भेट
Ans: दोन्ही विकसनशील देशांनी २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार करार ३० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Ans: भारत-ब्राझीलमध्ये तंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधने, औद्योगिक क्षेत्र, आरोग्य, डिजिटलट आणि कृषी यांसारख्या क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी वाढवण्यात येणार आहे.






