वास्तूशांतीचा कार्यक्रम आटोपरून परतणाऱ्या कुटुंबाबर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू
कन्नड : माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि कन्नड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव यांच्या फॉर्च्यूनर कारला अपघात झाला. चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्यावर हा अपघात सोमवारी सकाळी झाला. यामध्ये संजना जाधव यांच्यासह गाडीतील चौघे थोडक्यात बचावले. मात्र, यामध्ये गाडीचे मोठं नुकसान झाले.
संजना जाधव या चार कार्यकर्त्यांसह तालुक्यातील बनोटी सर्कलमधील वरठाण या ठिकाणी आपल्या (एमएच २० एफपी ०६३६) या गाडीने जात होत्या. नेमकं याचदरम्यान, समोरुन आलेल्या पिकअप (एमएच ४२ बीएफ ०६१३) चालकाच्या बाजूने जाधव यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात संजना जाधव, बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे, आडगावाचे माजी सरपंच ज्ञानेश्वर निकम, आदित्य गर्जे यांना कुठलीही दुखापत झाली नाही.
पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल
नशेत आणि अतिवेगाने वाहन चालविल्याने पिकअप चालक आकाश मच्छिंद्र गुंजाळ यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच दानवे समर्थक आणि जाधव समर्थकांमध्ये एकच चर्चा सुरु होती. मात्र, त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती मिळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
संजना जाधव-हर्षवर्धन जाधव यांच्यात घटस्फोट
रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी विवाह केला होता. मात्र, काही कौटुंबिक वादानंतर ते दोघे वेगळे झाले. आता हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचा घटस्फोटही झाला आहे. यानंतर आता राजकारणाच्या रिंगणात दोघे आमनेसामने आले आहेत.
हेदेखील वाचा : नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी दुतावासाकडून सूचना जारी; ‘हा’ आहे हेल्पलाईन क्रमांक