Physical Harassment
पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार (Rape on Girl) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीकडून तीन लाख रुपये तसेच दागिने घेऊन तिची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सूरज दशरथ काटकर (वय २६, रा. फुरसुंगी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला.
याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी परगावची आहे. सध्या ती पुण्यात काम करते. काटकरने तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार केला. तरुणीची छायाचित्रे मोबाइलवरुन काढून ती प्रसारित करण्याची धमकी दिली. तसेच तरुणीकडून वेळोवेळी तीन लाख रुपये आणि अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने घेऊन अपहार केला. याशिवाय, पैसे आणि दागिने मागितल्यानंतर काटकरने तरुणीला चाकूचा धाक दाखविला. तिला मारहाण करुन धमकावले. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास हडपसर पोलीस करत आहेत.
पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात विविध गुन्हे घडत आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता लग्नाच्या आमिषाने तरूणीवर बलात्कार करण्यात आला आहे.