Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Crisis Impact : नवराष्ट्रचा दणका! ‘तहानलेल्या गावा’ला दिलासा! कोळथरे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू

दापोली तालुक्यातील कोळथरे गावातील पाणीटंचाईच्या समस्येवर ‘नवराष्ट्र’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची ग्रामपंचायतीने दखल घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. टँकर व्यवस्था, पाईपलाईन दुरुस्ती आणि पर्यायी जलस्रोतांचा आढावा घेत तहानलेल्या गावाला दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 29, 2026 | 06:10 PM
नवराष्ट्रचा दणका! ‘तहानलेल्या गावा’ला दिलासा! कोळथरे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू

नवराष्ट्रचा दणका! ‘तहानलेल्या गावा’ला दिलासा! कोळथरे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू

Follow Us
Follow Us:
  • नवराष्ट्रच्या बातमीची दापोली कोळथरे ग्रामपंचायतीने घेतली दखल
  • पाणीटंचाई दूर करण्यासाठी हालचालींना वेग
  • कोळथरे गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू
Dapoli Water Crisis : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोळथरे ग्रामपंचायतीने पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नावर अखेर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘नवराष्ट्र डिजिटल’ मध्ये (Navarashtra Impact) प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत ग्रामपंचायतीने तहानलेल्या गावाला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजन सुरू करण्यात आले. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोळथरे गावातील तेली वाडी, गुरव वाडी, भुवड वाडी, बोथरे वाडी आणि जोशी वाडीसह अनेक भागांतील नागरिक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेवर पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाणी सोडणारे कर्मचारी, पाईपलाईन गळती दुरुस्त करणारे कर्मचारी आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे. गावाजवळील धरणात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही अनेक वाड्यांमध्ये नियमित पाणी पोहोचत नव्हते. विशेष म्हणजे, पाईपलाईन फुटल्यानंतर तिची दुरुस्ती 15 ते 20 दिवसांपर्यंत केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला होता.

धरणात पाणी मुबलक, तरी कोळथरे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; पाईपलाईन दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष?

या पार्श्वभूमीवर ‘नवराष्ट्र डिजीटल ’ने गावातील पाणीटंचाईची वस्तुस्थिती समोर आणणारे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर कोळथरे ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. गावात नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी टँकरची व्यवस्था, जलस्रोतांची पाहणी, पाईपलाईन दुरुस्ती आणि पर्यायी उपाययोजनांवर काम सुरू करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गावातील पाणीप्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणीची मागणी केली आहे.

‘या’ मंदिरात आहे साक्षात श्रीगणेशाचे पाऊल! इच्छापूर्ती करणारे कोकणातील प्रसिद्ध देवस्थान

Web Title: Dapoli kolthare gram panchayat water supply planning navarashtra news impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Dapoli
  • Navarashtra Impact
  • Ratnagiri
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर
1

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!
2

Ratnagiri CBSE School News: रोटरी स्कूल वैध की बेकायदेशीर? शिक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर नवा वाद!

Chiplun News: आमदार शेखर निकम यांचा पुढाकार; चिपळूणच्या प्रभाग ८ मधील रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती
3

Chiplun News: आमदार शेखर निकम यांचा पुढाकार; चिपळूणच्या प्रभाग ८ मधील रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली
4

Navarashtra Impact: अखेर मराठीला स्थान…! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.