कोकणात ठिकठिकाणी मंदिर पाहायला मिळतात. कोकणाला धार्मिकदृष्ट्या श्रीमंत असा वारसा लाभला आहे. श्री गणरायाचे आशीर्वाद असणारी या पावन भूमीत श्री सिद्धिविनायक मंदिर, श्री बल्लाळेश्वर मंदिर, श्री गणपतीमुळे मंदिर तसेच रेडीचा गणपती असे अनेक गणरायाचे स्थळ पाहायला मिळतात. त्यातील एक सुप्रसिद्ध देवस्थान म्हणजे आंजर्ल्याचा कड्यावरील गणपती!
पहिले पाऊल कड्यावर, दुसरे पाऊल थेट देवळात... (फोटो सौजन्य - Social Media)

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले गाव वसले आहे. समुद्रयाच्या अगदी किनारी असलेले गाव सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या गावातच जोग नदीचा मुख आहे. गाव निसर्गाने नटलेले आहे.

या निसर्गाच्या सानिध्यात जोग नदीच्या मुखाशी एका टेकडीवर गणरायांचे स्थान आहे. मंदिराच्या एक शेजारी जोग नदीचा मुख तर मागील बाजूस अथांग असा निळाशार समुद्र आहे.

असे म्हणतात की आधी हे देऊळ समुद्रकिनारी होते. अजयरायलेश्वराचे आणि श्री सिद्धिविनायकाचे हे देऊळ नैसर्गिक आपत्तीमुळे नजीकच्या कड्यावर बांधण्यात आले. तेव्हा पासून एक गोष्ट प्रचलित आहे की गणपतीने पहिले पाऊल कड्याच्या एका कोपर्यावर ठेवले आणि दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले.

जेथे पहिले पाऊल ठेवले गेले, तेथे गणपतीचे पाऊलखुण दिसून येते. दरवर्षी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या मागील बाजूस येथे जाण्याचा मार्ग आहे.

मंदिराच्या थेट समोर सुंदर असं तळं आहे. हे मंदिर कड्यावर असल्याने याला 'कड्यावरील गणपती' या नावाने ओळखले जाते. कोकणातील हे इच्छापूर्ती करणारे प्रसिद्ध देवस्थान आहे.






