कोकणवासीयांसाठी गुड न्यूज! मुंबई ते रत्नागिरी फक्त ४ तासांत, काय आहे हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्ग?
कोकणवासीयांना मुंबई गोवा मार्गावर नेहमीच ट्रॅफीक जामचा सामना करावा लागतो. सणासुदीच्या काळात तर गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होतात. यासर्व परिस्थितीत कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतून रत्नागिरीला आता फक्त ४ तासांमध्ये पोहोचता येणार आहे. केंद्र सरकारने हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाला हिरवा कंदील दाखवला असून हा मार्ग कोकणासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे.
पोलिसांच्या कारवाईनंतरही वाहनचालक बेशिस्तच! नियम मोडणाऱ्यांमुळे वाहतूक कोंडीला आमंत्रण
सहा पदरी या मार्गाची रुंदी १०० मीटर आणि ३७६ किमी लांबीचा महामार्ग असणार आहे. महामार्गासाठी ६८,७२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून अंदाजे ३७९२ हेक्टर जमीन संपादीत केली जाणार आहे. या महामार्गावर ४१ बोगदे, ५१ मोठे पूल आणि ६८ ओव्हरपास असणार आहेत. त्यामुळे कोकणातील डोंगररांगा आणि निसर्गसंपन्न प्रदेशाचा अनुभवही या प्रवासात येणार आहे.
अलिबाग-शहाबाद-रोहा, माणगाव-मेढेगाव, मंडणगड-दापोली-गुहागर-गणपतीपुळे, राजापूर-भालवली-देवगड, मालवण-कुडाळ-सावंतवाडी या कोकणातील प्रमुख शहरांना हा महामार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे कोकणच्या विकासाला गती मिळणार आहे. ग्रीनफिल्ड महामार्ग हा सागरी महामार्ग, मुंबई-गोवा महामार्गांना जोडला जाणार आहे. वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल अपेक्षित आहे. हा महामार्ग कोकणच्या आर्थिक, पर्यटन आणि सामाजिक विकासाला नवं वळण देणारा ठरेल, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त केली जात आहे.