फोटो सौजन्य- प्रतिनिधी
समीर पिंपळकर/ दापोली: शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुयोगने आपले शिक्षण दहावी पर्यंत पूर्ण करून आपल्या आई वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि चैतन्य गॅस एजन्सी दापोली येथे ६ वर्षांपासून कामाला होता.प्रमाणिकपणे काम करत साऱ्यांच्याच आदरास तो पात्र ठरत होता.तेथे तो तालुक्यातील ठराविक ठिकाणी गॅस सिलिंडर घरपोच सेवा देत असे.ग्राहक हा देव आहे आणि त्यांची सेवा आपण केली पाहिजे.कुणाचा सिलेंडर साठी फोन आला की तो आपली तत्पर सेवा बजावत असे त्याचमुळे सर्व ग्राहकांना तो हवासा वाटत असे. दापोली मंडणगड मार्गावरील माटवण फाटा येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात सुयोग सकपाळ (वय 24 ) याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या अथर्व कालेकरला गंभीर दुखापत झाली होती.
वयोवृद्धांसाठी देवदुत
रात्री-अपरात्री कोणाचाही फोन आला तरी कशाचीही तमा न बाळगता तातडीने लोकांच्या मदतीसाठी धावणारा , वयस्कर व्यक्ती त्यांची नेहमी कामासाठी वाट बघत, क्रिकेट , कबड्डी स्पर्धा यांमध्ये त्यांचे मोठे योगदान असायचे आवडते खेळ असल्याने तो दररोज कामावरून आल्यावर गावातील मुलांन बरोबर खेळत असे त्यामुळे त्यांना देखील आपल्या मधील एक सवंगडी नसल्याने सुयोग (बापूराव)ची कमतरता भासत आहे.
सुयोग सुरेश सकपाळ आवडीने त्याला गावामध्ये बापूराव म्हणत,याचा अपघाती मृत्यू सार्यानाच चटका लावून गेला आहे. त्याच्या मृत्यूने सकपाळ कुटुंबियांचा आधार हरपला असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर अवघा गावच शोकसागरात बुडाला.
बहिणीच्या लग्नाचे स्वप्न मात्र स्वप्नच
सुयोगला तिन्ह बहिणी दोन बहिणी ची लग्न झाली आहेत आणि लहान बहिण हिचे लग्न ठरले आहे.आपल्या बहिणीचे लग्न मोठ्या थाटामाटात व्हावे असे त्यांचे स्वप्न होते.तशी त्यांने तयारी देखील केली होती. घरची परिस्थिती गरिबीची होती आपल्या बहिणीचे लग्न मोठ्या थाटामाटात करायचे मात्र सुयोग (बापूरावच्या) बहिणीच्या लग्नाचे स्वप्न हे त्यांचे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले. आपला भाऊ लग्न थाटात करण्यासाठी येणार म्हणून रस्त्याकडे डोळे लावून वाट बघत आहे.आपला भाऊ सोडून गेल्यावर विश्वास बसत नाही.
सामाजिक कार्यातील योगदान
नेहमीच मदतीसाठी तत्पर असायचा एखाद्या रुग्णास उपचारासाठी शहरासारख्या ठिकाणी दाखल करायचे असल्यास तो तातडीने कोणाचे तरी वाहन घेऊन रुग्णास रुग्णालयात दाखल करायचा संकट काळात मदतीचा हात देण्यासाठी तो नेहमीच अग्रस्थानी असायचा गावासह मुंबईसारख्या ठिकाणीही मदतीसाठी धावून जाण्यासाठी तो नेहमीच पुढाकार घ्यायचा त्याचे सामाजिक कार्यातील योगदान अलौकिक होते.कोणत्याही वेळी कोणाचाही फोन आल्यानंतरतातडीने धावून जायचा.आई वडील मुलाच्या मायेला पोरकी झाली त्याच्या पश्चात आई, वडील, तिन बहिणी असा परिवार आहे.
आपली नोकरी सांभाळत असताना अपार कष्टही उपसायचा कुटुंबाचा रहाटगाडा हाकणाऱ्या सुयोग च्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबातील कर्त्याला नियतीने हिरावल्याने आई वडील मुलाच्या मायेला पोरकी झाली आहेत. त्याच्या अकाली निधनाने सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.गावातील लहान थोर आणि मित्र मंडळी, नातेवाईक वर्गही गहिवरला , आदरास पात्र ठरलेल्या सुयोग सकपाळ याच्या अपघाती मृत्यूने साऱ्यांनाच अश्रूंचा बांध फुटला स्मशानभूमीत त्याला भडाग्नी विल्यानंतर चिता पेटत असताना सारेच गहिवरले, मनमिळाऊ प्रेमळ असलेल्या शांत स्वभाव असलेल्या सुयोगच्या मृत्यूने गावातील लहान थोर मित्र मंडळ नातेवाईकानाही अश्रू लपवता आले नाहीत.