• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Metro Passengers Parking Worries Will Soon Be Over

मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण

पीएमपीएमएल बससेवा बळकट करण्याबरोबरच मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरणही करण्यात येत आहे. सध्या शहरात दोन मेट्रो मार्गांवर सेवा सुरू असून, नागरिकांकडून मेट्रोचा वापर हळूहळू वाढू लागला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 06, 2026 | 03:16 PM
मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण

मेट्रो प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची चिंता आता लवकरच मिटणार; महापालिकेचे सर्वेक्षण (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : मेट्रो स्थानकाच्या परिसरात पार्किंग व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण केले आहे. 31 ठिकाणी पार्किंग व्यवस्था उभी करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. शहरातील वाढत्या वाहनसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी पुणे महापालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

पीएमपीएमएल बससेवा बळकट करण्याबरोबरच मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरणही करण्यात येत आहे. सध्या शहरात दोन मेट्रो मार्गांवर सेवा सुरू असून, नागरिकांकडून मेट्रोचा वापर हळूहळू वाढू लागला आहे. मात्र, मेट्रोचा वापर करणाऱ्या प्रवाशांना एक महत्त्वाची अडचण भेडसावत आहे. अनेक ठिकाणी मेट्रो स्थानकापासून घरापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी फीडर सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक नागरिक दुचाकी वाहनाने मेट्रो स्थानकापर्यंत येतात; परंतु स्थानकांजवळ पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. पार्किंगची सुविधा नसल्यामुळे काही नागरिक मेट्रोऐवजी खासगी वाहनानेच प्रवास करणे पसंत करतात.

ही समस्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेने मेट्रो स्थानकांच्या परिसरात पार्किंग व्यवस्था विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या जागांचा सर्वेक्षण करण्यात आले आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले की, शहरातील महापालिकेच्या ३४ मोकळ्या जागांची पाहणी करण्यात आली असून, त्यापैकी ३१ ठिकाणी पार्किंग सुविधा उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांना मेट्रो स्थानकांजवळ आपली वाहने उभी करता येतील. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनाने शहरात आतपर्यंत जाण्याची गरज कमी होईल आणि मेट्रोचा वापरही वाढेल. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पार्किंग आणि इतर पूरक सुविधा उपलब्ध झाल्यास अधिकाधिक नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडतील, असा महापालिकेचा विश्वास आहे. यामुळे शहरातील वाढते वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासही मदत होणार आहे.

पार्किंग व्यवस्था केली जात आहे विकसित

सध्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वनाज ते रामवाडी आणि लवकरच सुरू होणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गांच्या स्थानकांच्या परिसरात ही पार्किंग व्यवस्था विकसित केली जाणार आहे. या तीनही मार्गांवरील मेट्रो स्थानकांच्या आसपास उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या जागांचा या प्रकल्पासाठी उपयोग केला जाणार आहे.

…तर मेट्रोने प्रवास करणे अधिक सोयीचे

महापालिका अधिकाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, पार्किंग व्यवस्था सुरू झाल्यानंतर नागरिकांसाठी मेट्रोने प्रवास करणे अधिक सोयीचे होईल आणि शहरात सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल. परिणामी, पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होऊ शकते.

हेदेखील वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांमध्ये ‘जुन्या-नव्यां’चा संगम; तिन्ही मतदारसंघांचे राजकीय समीकरण साधले

Web Title: Metro passengers parking worries will soon be over

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

कर्वेनगर मुख्य उड्डाणपूल चौक समस्यामुक्त व्हावा; नगरसेवक दुधानेंनी अधिकाऱ्यांना दाखविली दुरावस्था
1

कर्वेनगर मुख्य उड्डाणपूल चौक समस्यामुक्त व्हावा; नगरसेवक दुधानेंनी अधिकाऱ्यांना दाखविली दुरावस्था

पुण्यात आता अनधिकृत बांधकाम आढळल्यास अभियंताच जबाबदार; स्थायी समितीची बैठक चांगलीच गाजली
2

पुण्यात आता अनधिकृत बांधकाम आढळल्यास अभियंताच जबाबदार; स्थायी समितीची बैठक चांगलीच गाजली

संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल
3

संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल

कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने चार ते पाच वाहनांना उडविले
4

कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने चार ते पाच वाहनांना उडविले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Mar 06, 2026 | 09:37 PM
Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Mar 06, 2026 | 09:31 PM
MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

Mar 06, 2026 | 09:28 PM
NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Mar 06, 2026 | 09:23 PM
आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

Mar 06, 2026 | 09:06 PM
बापाचं स्वप्न लेकाने केलं पूर्ण! ‘या’ भाजप नेत्याचा मुलगा झाला IAS; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मारली बाजी

बापाचं स्वप्न लेकाने केलं पूर्ण! ‘या’ भाजप नेत्याचा मुलगा झाला IAS; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मारली बाजी

Mar 06, 2026 | 08:52 PM
Indian Railways News: भारतीय रेल्वेची सुसाट वाटचाल! मालवाहतुकीतून कमावला १४,५७१ कोटींचा महसूल; वार्षिक उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ

Indian Railways News: भारतीय रेल्वेची सुसाट वाटचाल! मालवाहतुकीतून कमावला १४,५७१ कोटींचा महसूल; वार्षिक उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ

Mar 06, 2026 | 08:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.