Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RPI Mahabaleshwar Protest: रिपाईच्या ‘नमस्कार’ आंदोलनाचा महाबळेश्वर नगरपालिकेला दणका! ३ तास टोलनाका बंद, लाखोंचा बसला फटका

Mahabaleshwar Toll Protest: महाबळेश्वर येथील वेण्णा लेक टोल नाक्यावर पर्यटकांच्या आर्थिक लुटीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने तीव्र आंदोलन केले. फास्टॅग आणि ऑनलाईन पेमेंट सुविधा नसल्याने प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 07, 2026 | 08:30 PM
रिपाईच्या 'नमस्कार' आंदोलनाचा महाबळेश्वर नगरपालिकेला दणका!

रिपाईच्या 'नमस्कार' आंदोलनाचा महाबळेश्वर नगरपालिकेला दणका!

Follow Us
Follow Us:
  • रिपाईच्या ‘नमस्कार’ आंदोलनाचा महाबळेश्वर नगरपालिकेला दणका!
  • ३ तास टोलनाका बंद
  • लाखोंचा बसला फटका
वाई : महाराष्ट्रभर गाजत असणाऱ्या महाबळेश्वर टोल प्रकरणा विरोधात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरातील टोल नाक्यावर पर्यटकांची होत असलेली आर्थिक लूट, मनमानी शुल्क आकारणी आणि जनतेच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आले.

रिपाईच्या आक्रमक भूमिकेमुळे दिवसभर टोल नाक्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. या आंदोलनाला पर्यटक, स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून चुकीच्या पद्धतीने कर वसूल करण्यात येत असतो यामध्ये वाहनाचा पोल्युशन कर वेगळा व गाडीमध्ये बसणाऱ्या प्रत्येक माणसामागे वेगळे पैसे घेतले जातात याव्यतिरिक्त फॉरेस्ट चा सुद्धा एक वेगळा कर आकारला जातो.

आज देशांमध्ये फास्टटटॅग येऊन जवळपास दहा ते बारा वर्षे झालेले आहेत. मात्र रोज लाखो पर्यटक येणाऱ्या महाबळेश्वर मध्ये आजही फास्टटॅग किंवा ऑनलाईन पेमेंट सुविधा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आला. अनेक वेळा प्रशासकीय कार्य काळामध्ये यासंबंधी लेखी माहिती मागवली असता याला योग्य प्रतिसाद महाबळेश्वर नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला नव्हता. त्यामुळेच आज महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून अवाजवी शुल्क आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवायांचे वारे राज्यभर; मात्र वाईत अजूनही ‘सब कुछ ठीक है’चे चित्र?

“पर्यटन वाढवायचे की पर्यटकांना लुटायचे?” असा सवाल उपस्थित करत टोल व्यवस्थापन आणि संबंधित प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनादरम्यान अनेक पर्यटकांनी रिपाईच्या भूमिकेचे स्वागत करत अभिनंदन केले. स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी देखील या लढ्याला पाठिंबा दर्शविला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने स्पष्ट इशारा दिला आहे की, पर्यटक आणि स्थानिक जनतेवरील अन्याय तात्काळ थांबविण्यात आला नाही, तर भविष्यात आणखी तीव्र आणि व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे जागतिक पर्यटनस्थळ असून पर्यटकांची लूट कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. “जनतेच्या हक्कासाठी संघर्ष हा आमचा धर्म आहे आणि अन्यायाविरोधातील लढा अखंड सुरू राहील,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

टोल नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे रिपाईच्या कार्यकर्त्यांनी हात जोडून स्वागत केले. श्री अशोक बापू गायकवाड यांच्या आदेशाने सुरु असणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व युवक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य श्री स्वप्नील भाई गायकवाड यांनी केले. या आंदोलनासाठी महाबळेश्वर तालुकाध्यक्ष जॉन भाई जोसेफ कार्याध्यक्ष आतिश भोसले श्री मिथुन तळवळकर श्री विनय गायकवाड फौजीया मुलानी संतोष तात्या गायकवाड श्रीकांत बापू निकाळजे एकनाथजी रोकडे अमर वाघमारे बाजीगर इनामदार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी संतोष पाटील थेट दुर्गम गावात मुक्कामाला! वाईच्या उळुंब गावी भरला ‘लोकदरबार’; VIP संस्कृतीला फाटा देत पत्रावळीवर जेवण

Web Title: Rpi protest at mahabaleshwar venna lake toll plaza against tourist exploitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Mahabaleshwar
  • Protest
  • Toll
  • Wai

संबंधित बातम्या

Thackeray Brothers: महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार; २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्च’
1

Thackeray Brothers: महाराष्ट्र पेटणार! विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार; २६ जुलैला मुंबईत ‘संयुक्त मोर्च’

Alibaug : दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद रायगडात, शेकापच्या बैठकीत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा
2

Alibaug : दिल्लीतील लाठीचार्जचे पडसाद रायगडात, शेकापच्या बैठकीत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!
3

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!

Toll : टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! आता मोबाईलवर काही मिनिटांत मिळणार Digital पास
4

Toll : टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! आता मोबाईलवर काही मिनिटांत मिळणार Digital पास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.