पनवेल (प्रतिनिधी) पनवेल मध्ये १५० ते दोनशे कोचिंग क्लासेस आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. निर्बंध नाही.पालकांकडून भरमसाठ फी आकारून सुद्धा पनवेलमध्ये कोचिंग क्लासला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा राम भरोसे असून कोणत्याही सोयी-सुविधा नसून जर आगीची घटना घडल्यास मुलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने भीतीचे वातावरण पसरले आहे .
पुर्वी आपला निकाल चांगला लागावा याकरीता शाळेत आणि कनिष्ठ महाविदयालयात शिक्षक विद्यार्थ्यांकडून पूर्ण तयारी करून घेत असत. त्याकरीता अतिरिक्त तासिका घेतले जात असे वेळ प्रसंगी सुट्टीच्या दिवशी शिकवले जात होते. मात्र अलिकडे शिक्षण पूर्णपणे खाजगीक्लासेसच्या आहरी जावू लागले आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. पनवेल परिसरातील अशा प्रकारचे खाजगी क्लासेसची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शाळेचे शुल्क त्याचबरोबर खाजगी क्लासेसचे पॅकेज भरता भरता पालक मेटाकुटीला आले आहेत. पनवेल परिसरात अनेक शैक्षणिक संस्थेत लाखो विदयार्थी शिक्षण घेतात.त्यांच्या पालकांवर शाळेच्या फीचा भार तर आहेच पण त्याचबरोबर खाजगी क्लासेसही विदयार्थ्यांना लावावे लागतात. याचा अर्थ शाळेत विद्यार्थ्यांनी किती मनापासून शिकवले जाते याचा प्रत्यय येतो. त्याचबरोबर विनाअनुदानीत शाळेत शिकवणारे शिक्षक खाजगी क्लासेस घेतात. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळतात.या व्यतिरिक्त रहिवाशी संकुलात सदनिक त्याचबरोबर गाळे भाडे तत्वावर खाजगी क्लासेस थाटण्यात येत आहे. आजच्या घडीला गल्लो गल्लीत कोचिंग क्लासेस असून त्यांमध्ये दरवर्षी भर पडत आहे. काही दिवसांनी पाऊलो पाऊली टयुशन दिसतील असे शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षात शाळेंमध्ये शिक्षकांची नोकरी मिऴत नाही मिळाली तर वेतन कमी असल्याने कित्येक जण खाजगी क्लास सुरू करतात. त्यामुळे प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे.
[read_also content=”राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा विजय; जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने आघाडी https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-lok-sabha-election-2024-supriya-sules-victory-from-baramati-constituency-nryb-542659.html”]
विशेषःता आठवी व नववीमधील जास्तीत जास्त विद्यार्थी खेचण्याचा प्रयत्न क्लासवाले करतात याचे महत्वाचे कारण हेच मुले पुढे दहावीकरीता क्लासमध्ये राहतात. याशिवाय शाळेमध्ये संपर्क वाढवून मुलांचा डाटा गोळा करण्यात येतो पत्ते, फोन नंबर शोधून संपर्क केला जात असल्याचे एका पालकांने सांगितले. दहावी आणि बारावीच्या समर व्हँकेशन बॅचेसकरीता जास्तीत जास्त विद्यार्थी मिळावेत याकरीता क्लासचालक जीवाचे रान करतात. गेल्या वर्षी दहावी आणि बारावीत चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे फोटो जाहिरातीकरीता वापरले जात आहेत. या व्यतिरिक्त पालकांना बोलावून क्लासमध्ये कशा प्रकारे शिकवले जाते. टेस्ट, तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनाचेही भांडवल करण्यात येत आहे. क्लास हे आता स्टेटस सिम्बाँल झाले आहे त्याशिवाय न पालकांना चैन पडत ना विद्यार्थ्यांना याचा अर्थ ते इतके अंगवळणी पडले आहे. पनवेल परिसरात महेश. युनिर्वसल, एसएमएस, ग्लोबल, विदया अलंकार या नावाने टयुटिरियल क्लासेस चालतात. इंजिनिअरिंग अकादमी, नायरक्लासेस, नवीन पनवेलमध्ये फेमस आहेत. या व्यतिरिक्त पनवेल, कळंबोली,कामोठे, खारघर या ठिकाणी शेकडो खाजगी क्लासेस आहेत. नववी दहावीकरीता ९० हजार ते १ लाख २० हजार इतके पॅकेज या ठिकाणी घेतले जात आहे. आकरावी व बारावीकरीता १ लाख ते दीड लाख रूपये फी विदयार्थ्यांकडून घेतली जात आहे. मित्र मैत्रिणी क्लास गेले म्हणून मुल सुध्दा अमुका एका क्लासचा हट्ट करतात. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी हजारो रूपये भरून प्रवेश घेऊन दयावाच लागतो याकरीता कत्येकांना कर्जही काढावी लागतात. एकिकडे शाळेची फी दरवर्षी वाढते आणि दुसरीकडे क्लासेसचे पॅकेज यामाध्यमातून पालकांची चारही बाजूने लुट होत आहे.
इंटीग्रेडेट पध्दतीचे अवलंब
पनवेल परिसरातील खाजगी क्लासेस वाल्यांनी कनिष्ठ महाविदयालयांबरोबर टायब केला आहे. अकरावी व बारावीच्या विदयार्थ्यांनी काँलेजमध्ये आठवडयातून फक्त एक किंवा दोन दिवस जायचे बाकी दिवस क्लासेसमध्ये धडे घ्यायचे अशी ही पध्दत आहे. त्या विदयार्थ्यांची हजेरी काँलेजमध्ये लावण्यात येते मात्र त्या वेळेत ते क्लासेसमध्ये असतात.काँलेजचा शिकवणण्याचा त्रास तर वाचतो त्याचबरोबर चांगला निकाल लागला तर नाव सुध्दा होते. त्याचबरोबर वार्षिक शुल्कही पालकांकडून प्राप्त होते. या दुहेरी फायदामुळे ज्युनिअर काँलेज क्लासेसबरोबर टायब करत आहेत. याकरीता विदयार्थ्यांना दोन ते अडिच लाख रूपये फी मोजावी लागत आहे. या क्लासेसमध्ये टॅब आणि रोबोनेटच्या अधारे शिकविण्यात येत आहे.
[read_also content=”पुण्यानंतर आता कोल्हापुरात भीषण अपघात, भरधाव कारने अनेकांना चिरडले, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर https://www.navarashtra.com/automobile/terrible-accident-in-kolhapur-many-people-were-crushed-by-a-speeding-car-a-heart-wrenching-video-came-out-542735.html”]
वास्तविक पाहता शाळांना मान्यता जेव्हा दिली जाते त्यावेळी संबधीत शिक्षण संस्थेने किंवा त्या ठिकाणी शिकवणाऱ्या शिक्षकांनी खाजगी क्लासेस घ्यायचे नाही असा अट टाकण्यात येते. मात्र ही बाब सर्रास पायदळी तुटवली जात आहे. जर शाळेतच चांगले शिकवले तर खाजगी क्लासेस अधार घेण्याची आवश्यकता नाही. ज्या प्रमाणे आरटीएच्य़ा माध्यमातून २५ टक्के प्रवेश दिला जातो त्याचप्रमाणे खाजगी क्लासेसलाही सक्ती करण्याची गरज आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता कोणतीही यंत्रऩा नाही याबाबत शासनाने गांभिर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली असून भरमसाठ पैसे घेऊन सुद्धा अश्या क्लासेस मध्ये विध्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुरक्षतेचा अभाव दिसून येत आहे .