आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aaryan Khan Case) समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि समीर वानखेडेची (sameer wankhede) चॅट (whatsapp chat) व्हायरल झाल्यानंतर वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी समीर वानखेडेंच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहे. समीर वानखेडे यांना आता थेट दाऊद इब्राहिमच्या नावाने (Dawood Ibrahim) ही धमकी देण्यात आल्याची
धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्यावर किंवा कुटुंबावर हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल वानखेडे यांनी पोलिसांना केला आहे.
समीर वानखेडे यांची तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यासाठी 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडेवर आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयच्या कारवाईविरोधात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यानंतर वानखेडे यांना उच्च न्यायालयाकडून 22 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने हा दिलासा 8 जूनपर्यंत वाढवला आहे.
समीर वानखेडेवर (Sameer Wankhede) आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा प्लॅन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्यन खानला आरोपी न करण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचं सांगण्यात येत आहे. या आरोपाखाली सीबीआयने समीर वानखेडविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सीबीआयने अलीकडेच वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. वानखेडे यांनी उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठासमोर दाखल केलेल्या याचिकेत सीबीआयकडे दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात आपल्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, अशी विनंतीही केली आहे. वानखेडे यांच्या अर्जावर खंडपीठाचा निर्णय येणे बाकी आहे.
एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.