Ajit Pawar Plane Crash: अजित पवार: मुख्यमंत्री पदाची हुलकावणी: एका संघर्षाचा न संपलेला प्रवास
अजित पवार यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. १९९९ मध्ये अजित पवार यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. अजित पवार यांनी पाटबंधारे आणि फलोत्पादन हे खाते मिळाले. २००४ मध्ये अजित दादांची नाराजी पहिल्यांदाच समोर आली. २००४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी असतानाही शरद पवार यांनी काँग्रेसशी बोलणी करून मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात पवारांनी 2 कॅबिनेट पदं आणि अतिरिक्त राज्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे घेतली.
Ajit Pawar Death: पहाटेचा शपथविधी ते पक्षफूट… अजित पवारांच्या आयुष्यातील 5 निर्णायक क्षण
त्यावेळी अजितदादांना जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या खात्याचे मंत्रीपद मिळाले. मुख्यमंत्रीपद चालून आलेले असतानाही त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही. ‘2004 मध्ये मुख्यमंत्रिपद सोडणे ही राष्ट्रवादीची सगळ्यात मोठी चूक होती.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
२००८ सालीही अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा समोर आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांऐवजी छगन भुजबळ यांची निवड करण्यात आली होती. मात्र, २०१० मध्ये ‘आदर्श घोटाळा’ समोर आल्यानंतर भुजबळांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या पदासाठी शरद पवारांची पहिली पसंती अजित पवार नसून दुसराच नेता होता, हे स्पष्ट झाल्यामुळे ती सल अजितदादांच्या मनात कायम राहिली असावी, असे म्हटले जाते.
दरम्यान, 2009 मध्ये शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केला. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंची राजकारणात एंट्री झाल्यानंतर शरद पवार यांचा खरा वारसदार अजित पवार नसून सुप्रिया सुळे याच आहेत, आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास सुप्रिया सुळेचंच नाव पुढे केलं जाईल, अशाही चर्चा सुरू असायच्या.
२०१२ मध्ये सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला, मात्र काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पुढे २०१९ मध्ये रोहित पवार कर्जत-जामखेडमधून विजयी झाले, तर अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. या निकालामुळे अजितदादा नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांची नाराजी आणि महत्त्वाकांक्षा ‘पहाटेच्या शपथविधी’तून जाहीरपणे समोर आली. त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन मोठा राजकीय भूकंप घडवला. मात्र, शरद पवारांच्या मुत्सद्देगिरीमुळे ते पुन्हा पक्षात परतले आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि अजितदादांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले; त्यावेळीही मुख्यमंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली.
२०२३ मध्ये राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे झाली, अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत सामील झाले. त्यांच्या बंडाच्या काळात अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. अशा चर्चा सुरू झाल्या. केवळ मुख्यमंत्रिपदाचे ध्येय गाठण्यासाठीच अजित पवार पुन्हा एकदा बंडखोरी केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली. पण त्यावेळीही अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले.
त्यानंतर २०२४ अजित पवार यांनी खुलेआम मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती.मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण वारंवार उपमुख्यमंत्रीपदावर अडकतो.” असं विधान त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. ‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी आपली मुख्यमंत्रिपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. “मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण मला संधी मिळत नाहीये,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपद मिळवण्याची मोठी संधी होती, परंतु पक्षाने ती गमावली, असेही त्यांनी नमूद केले.
२००४ च्या विधानसभा निवडणुकीत ७१ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता, तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. तरीही, राजकीय तडजोडीत मुख्यमंत्रिपद काँग्रेसच्या खात्यात गेले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख यांचे २०१२ मध्ये निधन झाले.” असंही त्यांनी नमुद केलं होतं.






