Sanjay Raut News:'विरोधी पक्षनेत्यापासून वेगळ्या विदर्भापर्यंत...; संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले
राज्यातील दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणं ही लोकशाहीसाठी लाजीरवाणी बाब असल्याचं सांगत राऊत म्हणाले, “विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेता असणं ही लोकशाहीची गरज आहे. मात्र गेल्या १०–११ वर्षांपासून विरोधी पक्षनेता ठेवूच नये अशीच मानसिकता सत्ताधाऱ्यांची आहे. महाराष्ट्रात दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही, याचा अर्थ सत्ताधारी विरोधाला, विरोधकांना घाबरतात. त्यांच्या चुका दाखवल्याच जाऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांना ही भीती आहे.” (Maharashtra politics news)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचे संकेत पाळायला तयार नाहीत, पण संसदेत राहुल गांधी विरोधी पक्षनेता असल्यामुळे भाजपचे धिंडवडे काढत आहेत. त्यामुळे अमित शहांपासून सगळेच घाबरलेले दिसत आहेत. संसदेत राहुल आणि प्रियांका गांधींमुळे तरी चर्चेला जान आहे, पण महाराष्ट्राच्या विधिमंडळात दशावतार सुरू आहेत.” अशी टिकाही त्यांनी केली.
पुढील अधिवेशनात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीतावर चर्चा व्हावी, अशी मागणी करत राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या लढ्यात गौतम अदानी नव्हते. पण आता महाराष्ट्र कसा ओरबडला जातोय, यावर चर्चा झाली पाहिजे. मुंबईच्या लढ्यात भाजप कुठेच नव्हता. महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सर्व पक्षांनी एकत्र यायला हवं, जरी पक्षीय मतभेद असले तरी.”
विदर्भ वेगळा करण्याच्या मुद्द्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावरही त्यांनी टीका केली. “विदर्भ वेगळा करण्याचं काम सुरू असल्याचं बावनकुळे सांगतात, तरीही शिंदे गटातील एकही मंत्री उसळून उठत नाही. याचा अर्थ सगळे अमित शहांच्या दबावाखाली आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून यशोमती ठाकूर आक्रमक,
महाराष्ट्र–गुजरात सीमेवर बोलताना राऊत म्हणाले, “पालघरमध्ये गुजरातने पूर्णपणे घुसखोरी केली आहे. सीमारेषा ओलांडून गुजरातने प्रवेश केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात पालघरवर दावा करण्यात आला होता. बुलेट ट्रेन गुजरातमार्गे नेण्यामागेही हीच मानसिकता आहे.” मात्र, वाद वाढवण्यात फारसा रस नसल्याचं सांगत त्यांनी स्पष्ट केलं की, “काँग्रेस कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आहेत.”






