'मातोश्री'वर लिंबू अन् काळी जादू; फडणवीस 'वर्षा'वर का राहत नाहीत? राऊतांचा राणेंना सवाल
“मला एक प्रश्न आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाही? याचं उत्तर या काळ्या जादूवाल्यानं द्याव. माझ्या नादाला लागू नका”,असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून, ‘मातोश्री’वर लिंबू कापले जात आहेत, काळी जादू केली जात आहे, उपास-तपास केले जात आहे. अनेक साधू-संतांना भेटलं जात आहे, असा आरोप केला होता. त्यावर राऊतांनी जशास-तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले, “मला एक प्रश्न आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाही? काळी जादू, काळी जादू म्हणत आहात ना, देवेंद्र फडणवीस आजही मुख्यमंत्र्यांच्या विकृत निवासस्थानी राहायला का जात नाही? याचं उत्तर या काळ्या जादूवाल्यानं द्याव. माझ्या नादाला लागू नका”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र यावं, असे विधान केले. त्यावर संजय राऊत यांनी संजय शिरसाट म्हणजे अटलबिहारीच आहेत. महान माणूस आहे. ते करू शकतात. त्यांच्या भावनाविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. ते काहीही करू शकतात. शरद पवार अन् अजित पवार यांना एकत्र आणू शकतात. चांगली गोष्ट आहे. त्यांच्याविषयी आभारी आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बजेट कळालेलं नाही. बजेट कळून घेण्यासाठी किमान 72 तास जावे लागतात. देशाचे बजेट नुसते आकडे अन् घोषणांवर चालत नाही. आम्हाला बजेट समजावून घेण्यासाठी नानी पालखवाल यांचे भाषण ऐकायला जावं लागत होते. हे चिंतामणराव देशमुख, रघुराम राजन आहेत का, दोन तासात बजेट समजायला?’, असा टोला लगावला.
मध्यमवर्गींना खूश करणारे बजेट आहे. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत मध्यमवर्गींची मते भाजपला पडलेली नाहीत. ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून मते चोरली. मध्यमवर्गीय अजून धक्क्यात आहे. त्यांना मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न आहे. बजेटमधून लोकांना नेमकं काय मिळाले, हे शोधावं लागेल. अजून तरी थोडा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
महाराष्ट्राला काय मिळाले आहे, यावर बोलताना संजय राऊत यांनी मोदींचे प्रत्येक बजेट राज्यांच्या आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं जाते. भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत, तिथं बिहारवर अक्षरशं वर्षांव, जिथं भाजपचे राज्य नाही, म्हणजे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक किंवा महाराष्ट्र असेल, तिथं तोंडाला पान पुसायची आणि पुढं जायचं. भाजपचे लोकं आहे, ते अंधभक्त आहेत, ते टाळ्या वाजवत बसतात, असा टोला लगावला.