Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निदा खान प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील! त्यांना तात्काळ अटक करा; पालकमंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी निदा खान प्रकरणावरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 09, 2026 | 04:23 PM
निदा खान प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील! त्यांना तात्काळ अटक करा- पालकमंत्री संजय शिरसाट

निदा खान प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील! त्यांना तात्काळ अटक करा- पालकमंत्री संजय शिरसाट

Follow Us
Follow Us:

 

  • निदा खान प्रकरणाचे सूत्रधार इम्तियाज जलील!
  • त्यांना तात्काळ अटक करा
  • पालकमंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप
Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel: निदा खान प्रकरण हे केवळ ‘टीसीएस’ नाशिकपुरते मर्यादित नाही तर संपूर्ण राज्यात याची पाळेमुळे पसरलेली आहेत हे मी वारंवार सांगत होतो. आता नाशिकनंतर पुणे आणि संभाजीनगरातही अशा घटना समोर आल्या आहेत. यामागे एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हेच सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप करून त्यांना पोलिसांनी अटक करून चौकशी केल्यास यात आणखी उलगडा होईल अशी अपेक्षा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणी निदा खान मुद्यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याने इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच निदा खानला आश्रय दिला होता. हे आता स्पष्टही झाले आहे. आता पोलिसांनी जलील यांना नोटीस द्यावी, त्यांना बोलवून घ्यावे, त्यांचे स्टेटमेंट घ्यावे आणि अटक करावी. जोपर्यंत जलील यांना अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणामागेही सूत्रधार कोणाचे हे समोर येणार नाही. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या घडामोडींनुसार जलील हेच याचे सूत्रधार असल्याचे दिसत आहे.जलील यांच्याकडे निदा खानला कोणी पाठवले हाही मोठा प्रश्न आहे. या सर्व बाबींचा उलगडा व्हायचा असेल तर आधी जलील यांना अटक करणे गरजेचे असल्याचे शिरसाट म्हणाले.

शिरसाट- सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई; एकाच गाडीतून दोघेही बँकेत झाले दाखल

इंधन दरवाढीबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, आखाती देशातील युद्धाचा परिणाम केवळ भारतावरच नव्हे तर जगभरातील देशांवर झालेला आहे. युद्धामुळे पेट्रोल, डिझले, गॅससोबतच इतर वस्तूंचे दरही वाढले आहेत. बराचसा माल वाहतुकीवर अवलंबून असल्याने ही दरवाढ दिसतेय. युद्ध बंद झाले तरच या किमती कमी होतील. युद्ध आणखी चिघळल्यास किमतीही वाढतील ही शंका प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. युद्ध थांबवणे हाच यामागील पर्याय आहे दरवाढीला थांबवणं अवघड असल्याची भीती पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

पेपर लीकमधील दोषींना सोडणार नाही

नीट परीक्षेचा पेपर लीकमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोज जनता पार्टीने केली आहे. यावर पालकमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या घटनेला चुकीचे म्हटले आहे. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकरणात गुंतलेले अधिकारी, कोचिंग क्लासेस आणि संबंधितांना अटक करण्याचे सत्र सुरु केले आहे. पेपर फुटण्याला कोणाचेही समर्थन नाहीच तर, फोडणाऱ्यांवर कारवाई ही सरकारची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जो खेळेल त्याला माफी दिली जाणार नाही, अशी शिवसेनेचीही भूमिका असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

संभाजीनगरमध्ये इंधन संकट भीषण! पालकमंत्र्यांच्या तंबीनंतर पेट्रोल आले, पण डिझेल संपले; ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी हवालदील

Web Title: Sanjay shirsat alleges imtiaz jaleel as mastermind of nida khan case demands arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Imtiaz Jaleel
  • MAL Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
2

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.