धनंजय मुंडे (फोटो- ट्विटर)
नागपूर: बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. सध्या या प्रकऱणातील पोलीस एसपींची तत्काळ बदली करण्यात आली आहे, एवढ्यावरच न थांबता या प्रकरणातील पाळंमुळं खोदली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर विरोधक निशाणा साधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान आता खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनी यावर भाष्य केले आहे.
बीडमध्ये झालेल्या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीडच्या मस्साजोगमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. ते लवकरात लवकर बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण इथपर्यंत प्रकरण मर्यादीत नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील.” फडणवीस म्हणाले, “ आवाडा एनर्जी कंपनीने पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली. यातून काहींना रोजगार मिळतो, पण आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या, असाही प्रकार उघडकीस आला आहे. 6 डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या दरम्यान अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी आवाड ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर हल्ला केला. सर्वात आधी त्यांनी वॉचमॅम अमरदिप सोनावणेला मारहाण केलीय त्यानंतर मॅनेजर शिवाजीराव थोपटेलाही शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर वॉचमॅननं सरपंट संतोष देशमुखांना दिली.
हेही वाचा: Santosh Deshmukh: हल्लेखोरांनी बोटं मोडली, लायटरने डोळे जाळले…; बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अटक
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे. वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे या प्रकरणात विरोधक धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधताना पाहीला मिळत आहेत. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. मात्र यावेळी मुंडे हे सभागृहात नसल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आता यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
सभागृहात उपस्थित नसल्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडे म्हणाले, “त्या चर्चेत उत्तर हे मुख्यमंत्री देणार असतील तर, परंपरेप्रमाणे मी सदनात उपस्थित राहिलो नाही. विरोधक काही बोलले की माझ्याकडे काही जाणार. मग मुख्यमंत्र्यांना बोलायला अडचण होणार. त्यामुळे एकदा काय दूध का दूध, पानी का पानी व्हावे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने ते स्पष्ट झाले आहे. मी आधीपासून म्हणत आहे की हे व्यवहारातून झालेले भांडण आहे. आता यामध्ये एसआयटी स्थापन झाले आहे. आता याचा शेवटपर्यंत तपास होईल. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिले आहे त्यामुळे सर्वांचे समाधान झाले आहे.
हेही वाचा: Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट: मुख्यमंत्री फडणीसांची सभागृहात मोठी घोषणा
दरम्यान, याप्रकरणात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला जो फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवेल किंवा त्याच्या एन्काऊंटर करेल त्या अधिकाऱ्याला 51 लाखांचे बक्षीस दिले जाईल. इतके नव्हे तर त्याला पाच एकर जमीनही देण्यात येईल. तसेच जो अधिकारी देशमुखांच्या आरोपीला लवकरात लवकर अटक करेल त्यांना दोन लाख रूपये रोख बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा माढ्यातील शेतकऱ्याने केली आहे.