Photo Credit- Social Media
मुंबई: बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. सध्या या प्रकऱणातील पोलीस एसपींची तत्काळ बदली करण्यात आली आहे, एवढ्यावरच न थांबता या प्रकरणातील पाळंमुळं खोदली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
बीडमध्ये झालेल्या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीडच्या मस्साजोगमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. ते लवकरात लवकर बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण इथपर्यंत प्रकरण मर्यादीत नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील.
Devendra Fadnavis: “भास्कर जाधव नागरिकशास्त्राच्या तासाला …”; मुख्यमंत्री फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
फडणवीस म्हणाले, “ आवाडा एनर्जी कंपनीने पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली. यातून काहींना रोजगार मिळतो, पण आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या, असाही प्रकार उघडकीस आला आहे. 6 डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या दरम्यान अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी आवाड ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर हल्ला केला. सर्वात आधी त्यांनी वॉचमॅम अमरदिप सोनावणेला मारहाण केलीय त्यानंतर मॅनेजर शिवाजीराव थोपटेलाही शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर वॉचमॅननं सरपंट संतोष देशमुखांना दिली.
वॉचमॅनकडून माहिती मिळताच सरपंचआणि काही जण त्याठिकाणी पोहटले. आपल्या माणसांना दुसऱ्या गावातील काही लोक मारहाण करत असल्याचे पाहून त्यांनी मारेकरऱ्यांना हूसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यातच मारामारी झाली.9 डिसेंबरला संतोष देशमुख देशमुख गावी परत जाण्यासाठी निघाले होते. ते एकटेच असताना वाटेत त्यांनी आतेभाऊ भेटले आणि त्यांना सोबत घेऊन निघाले.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात
पण टोल नाक्याजवळ एक काळ्या रंगाची गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर त्यांनी देशमुखांची गाडी अडवली. काचफोडून त्यांनी त्यांना गाडीबाहेर काढले आणि काळ्या रंगाच्या गाडीत घालून त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणात त्यांना काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणातला मास्टरमांईड कुणीही असला तरी त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस महानिरिक्षक पातळीवर एसआयटी स्थापन केली जाईल, याशिवाय न्यायालयीन चौकशीचीही केली जाणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केलं. याशिवाय बीडच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांचीही बगली होणार असल्याचे फडणवीसांनी नमुद केल आहे.
दरम्यान, याप्रकरणात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला जो फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवेल किंवा त्याच्या एन्काऊंटर करेल त्या अधिकाऱ्याला 51 लाखांचे बक्षीस दिले जाईल. इतके नव्हे तर त्याला पाच एकर जमीनही देण्यात येईल. तसेच जो अधिकारी देशमुखांच्या आरोपीला लवकरात लवकर अटक करेल त्यांना दोन लाख रूपये रोख बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा माढ्यातील शेतकऱ्याने केली आहे.