Photo Credit- Social Media संतोष देशमुखांच्या घरी आलेल्या अज्ञात महिलेने थेट बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्ट धरला
बीड: डिसेंबर महिन्यात झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून, मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे, आणि सीआयडीने तब्बल दीड हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येची सुनावणी सुरू असताना त्यांचे शेवटचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. निवडणुकीदरम्यान प्रचार करत असतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये ते त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयी बोलताना दिसत आहेत. ही हत्या केवळ राजकीय नाही, तर सामाजिक कार्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे.
शिवेंद्रराजे, अपमान का सहन करता? तुम्ही राजीनामा द्या; काँग्रेसचे आवाहन
संतोष देशमुख यांच्या शेवटच्या भाषणातील शब्द आजही अनेकांच्या मनात कोरले गेले आहेत. ते म्हणाले होते, “मला गरिबांसाठी काम करायचे आहे. मला राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करायचे आहे. समाजकारणाची मला पहिल्यापासून आवड आहे. 10 वर्षांपासून माणसांची दारू सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी व्यसनमुक्तीसाठी फार झटलो आहे. मी कधी पैशांच्या मागे गेलो नाही. दुष्काळात स्वखर्चाने गावाला मदत केली आहे.”
संतोष देशमुख यांनी मस्साजोग गावाचे 10 वर्षे सरपंच म्हणून नेतृत्व केले. गावात त्यांनी दारूबंदी राबवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. शांत स्वभाव आणि कामावर दृढ विश्वास ठेवणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. प्रसिद्धीच्या मागे न धावता, त्यांनी आपल्या कार्यातून जनमानसात जागा निर्माण केली. त्यांनी वाल्मिक कराड यांचे गुंड गावातील कंपनीतून खंडणी वसूल करत असल्याचा कडाडून विरोध केला होता. त्याचबरोबर, कंपनीत काम करणाऱ्या गावातील तरुणाला मारहाण करणाऱ्या कराडच्या माणसांना त्यांनी धडा शिकवला. याच विरोधामुळे, त्यांच्याविरोधात कट रचण्यात आला.
Maharashtra Council Bypoll 2025: विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळणार? काय आहे गणित
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली. सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण झाल्याचे स्पष्ट करणारे फोटो समाविष्ट केले होते.हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यातून आरोपींनी किती निर्दयीपणे त्यांना मारहाण केली, हे उघड झाले आहे. या धक्कादायक फोटोंमध्ये संतोष देशमुख यांना निर्दयपणे मारहाण केली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.या घटनेमुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर जनक्षोभ वाढला असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.