Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार, सरासरीच्या १०३.४ टक्के वर्षाव; खंडाळा, वाई, फलटण, कऱ्हाड, जावळीत समाधानकारक बरसात

जुलैअखेर सातारा जिल्ह्यात सरासरीच्या १०३.४ टक्के पावसाची नोंद झाली असून खरीप हंगामाला दिलासा मिळाला आहे. मात्र, सातारा, पाटण, माण आणि महाबळेश्वर तालुक्यांमध्ये अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ऑगस्टमधील पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 31, 2026 | 09:46 PM
सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार, सरासरीच्या १०३.४ टक्के वर्षाव

सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार, सरासरीच्या १०३.४ टक्के वर्षाव

Follow Us
Follow Us:

सातारा, दि. ३१ (प्रतिनिधी) – जुलै महिन्याच्या अखेरीस सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन करत समाधानकारक हजेरी लावली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ५१८.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीच्या १०३.४ टक्के आहे. केवळ ३१ जुलै रोजी जिल्ह्यात २८ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांसह धरणांच्या पाणीसाठ्याबाबत दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात खंडाळा तालुक्याने सर्वाधिक १७६.७ टक्के पावसाची नोंद करत आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ वाई (१५४.२%), फलटण (१२६.८%), कऱ्हाड (११४.९%), खटाव (११२.२%) आणि जावळी (१३०.४%) या तालुक्यांमध्येही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

दुसरीकडे, सातारा (८५.८%), पाटण (८१.४%), माण (७३.१%), महाबळेश्वर (८१.९%) या तालुक्यांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून, पुढील काही दिवसांच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर कोरेगाव तालुक्यात ९४.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

Maharashtra Rain Alert: सावधान! राज्यावर ढगांची दाटी; पुण्यात दाणादाण अन् भिडे पूल पाण्याखाली, कोकणात…

महाबळेश्वर तालुक्यात १ जूनपासून २,५४९.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्यातील महाबळेश्वर शहरातच ४,६३८.५ मिमी पाऊस झाला आहे. जावळी तालुक्यातील बामणोली येथे १,५१०.६ मिमी, तर पाटण तालुक्यातील हेलवाक येथे १,५६७.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पर्जन्यमान (१ जून ते ३१ जुलै)

खंडाळा – १७६.७%

वाई – १५४.२%

जावळी – १३०.४%

फलटण – १२६.८%

कऱ्हाड – ११४.९%

खटाव – ११२.२%

कोरेगाव – ९४.४%

सातारा – ८५.८%

महाबळेश्वर – ८१.९%

पाटण – ८१.४%

माण – ७३.१%

हवामान विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार, सातारा जिल्ह्याने जुलैअखेर सरासरी पावसाचा टप्पा ओलांडला असला, तरी तालुकानिहाय पर्जन्यमानात मोठी तफावत कायम आहे. त्यामुळे आगामी ऑगस्टमधील पावसावर खरीप हंगामाचे पुढील चित्र अवलंबून राहणार आहे.

Pune Rain: सावधान बाहेर संकट उभं आहे! खडकवासल्यातून 43 हजार क्यूसेकने विसर्ग; पुढील काही तास…

Web Title: Satara rainfall update july 2026 103 percent rainfall district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • Rain News
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Rain: शिवडे येथे उत्तर मांड नदीच्या पुलावरून पाणी; वाहतूक बंद, उंब्रज परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा
1

Satara Rain: शिवडे येथे उत्तर मांड नदीच्या पुलावरून पाणी; वाहतूक बंद, उंब्रज परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा

एकसरमध्ये साकारतेय ५० प्रजातींचे ‘घनवन’; अडीच हेक्टरमध्ये ३० हजार झाडांची लागवड, ग्रामपंचायतीने वन विभागाला दिली जागा
2

एकसरमध्ये साकारतेय ५० प्रजातींचे ‘घनवन’; अडीच हेक्टरमध्ये ३० हजार झाडांची लागवड, ग्रामपंचायतीने वन विभागाला दिली जागा

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल २०२.२० मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत
3

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल २०२.२० मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत

गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील तीन दिवसांसाठी…
4

गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील तीन दिवसांसाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.