पुण्यात पावसाचा जोर वाढला (फोटो- सोशल मिडिया)
पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात देखील अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. पानशेत, टेमघर, वरसगांव आणि खडकवासला धरण साखळीत जोरदार पाऊस झाला आहे. खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातून पणेच विसर्ग करण्यात आला आहे.
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदीपत्रात उतरू नये, खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपत्रात 45 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
#खडकवासला धरणातून विसर्ग ४५ हजार क्यूसेकपर्यंत सोडावा लागणार आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, नदीपात्रात उतरु नये-किरण देशमुख, कार्यकारी अभियंता
खडकवासला पाटबंधारे विभाग
पुणे#Khadakwasla #Dam#Water#Dam — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 31, 2026
|
धरणसाखळीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होत आहे. मुठा नदीपत्रात विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाण्याची आवक आणि पावसाचा जोर पाहता विसर्ग कमी किंवा जास्त केला जाणार आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. अन्य तीन धरणे देखील जवळपास पूर्ण भरत आली आहेत. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. खडकवासला धरणातून विसर्ग ४५ हजार क्यूसेकपर्यंत सोडावा लागणार आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, नदीपात्रात उतरु नये-किरण देशमुख, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग ,
पुणे
Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलसागर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.






