Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Rain: शिवडे येथे उत्तर मांड नदीच्या पुलावरून पाणी; वाहतूक बंद, उंब्रज परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा

Satara Rain: उंब्रज आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर मांड नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. शिवडे-उंब्रज जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अनेक गावांतील ओढे-नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

  • By विवेक
Updated On: Jul 31, 2026 | 10:12 PM
शिवडे - उंब्रज रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली.

शिवडे - उंब्रज रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली.

Follow Us
Follow Us:

उंब्रज/प्रतिनिधी : शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने उंब्रजसह परिसराला चांगले झोडपून काढले. दुपारी एक वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. मुसळधार पावसाने उंब्रज परिसरातील वराडे, तासवडे, बेलवडे हवेली, तळबीड, कोर्टी, पेरले, भोसलेवाडी, भुयाचीवाडी, इंदोली तसेच चोरे परिसरातील ओढ्या नाल्यांना खळखळून पाणी वाहू लागले असून कृष्णा,तारळी, उत्तर मांड नद्यांसह अनेक ओढे नाले, दुथडी भरून वाहू लागले आहेत.

उत्तर मांड नदीला पावसाने मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने शिवडे गावच्या पश्चिम भागात भवानवाडी रोडला पाणी रस्तापर्यत आले आहे. या पाण्यात अनेक वीट भट्ट्या, इमारत, निरंकारी भवन, पिके यांना पाण्याचा वेढा पडला आहे. शिवडे ते उंब्रज जोडणाऱ्या उत्तर मांड नदीवरील जुन्या नदीच्या पुलावरून दुपारी साडेबारा नंतर पाणी वाहू लागल्याने या पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव उंब्रज पोलिसांकडून येथे बॅरिगेट लावण्यात आले आहेत.

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल २०२.२० मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत

दरम्यान उंब्रज येथे राज्य मार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आल्याने उंब्रज येथे पाण्याचे तलाव निर्माण होवून दिवसभर वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण झाला आहे. आशियाई महामार्गवर व सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून वाहतूकीस अडथळा निर्माण झाल्याचे चित्र आहे.

सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार, सरासरीच्या १०३.४ टक्के वर्षाव; खंडाळा, वाई, फलटण, कऱ्हाड, जावळीत समाधानकारक बरसात

Web Title: Satara shivde uttar mand river bridge submerged umbrej heavy rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • Rain News
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार, सरासरीच्या १०३.४ टक्के वर्षाव; खंडाळा, वाई, फलटण, कऱ्हाड, जावळीत समाधानकारक बरसात
1

सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार, सरासरीच्या १०३.४ टक्के वर्षाव; खंडाळा, वाई, फलटण, कऱ्हाड, जावळीत समाधानकारक बरसात

एकसरमध्ये साकारतेय ५० प्रजातींचे ‘घनवन’; अडीच हेक्टरमध्ये ३० हजार झाडांची लागवड, ग्रामपंचायतीने वन विभागाला दिली जागा
2

एकसरमध्ये साकारतेय ५० प्रजातींचे ‘घनवन’; अडीच हेक्टरमध्ये ३० हजार झाडांची लागवड, ग्रामपंचायतीने वन विभागाला दिली जागा

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल २०२.२० मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत
3

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल २०२.२० मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत

गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील तीन दिवसांसाठी…
4

गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील तीन दिवसांसाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.