मुंबई : देशभरात कोरोना रुग्णांमध्ये (Corona) वाढ होत आहे. ही वाढ देशभरातील नागरिकांची चिंता वाढवणारी आहे. मुंबईतही कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली असुन दररोद मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळताना दिसत आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आजपासून वृद्धांना कोविड-19 ची नाकावाटे लस देण्यास सुरुवात करण्यात येत आहे. मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर इन्कोव्हॅक (iNCOVACC) ही नाकावाटे लस दिली जाणारी लस ( Intra-Nasal Vaccine) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
[read_also content=”कचोरी प्रेमींसाठी आंनदाची बातमी! शेगावची प्रसिद्ध कचोरी आता मिळणार रेल्वेतही, “रेल्वे कोच रेस्टॉरंट” मध्ये बसुन घ्या आस्वाद https://www.navarashtra.com/maharashtra/shegaon-kachori-will-be-avikabale-in-train-now-railway-has-started-railway-coach-restaurant-in-buldana-railway-station-nrps-392423.html”]
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वृद्धांसाठी ही लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बिएमसीतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे. भारत बायोटेकची इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) नाकावाटे दिली जाणारी लस जेष्ठ नागरिकांना घेता येणार आहे. यासाठी मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे या केंद्रांची यादी जारी करण्यात आली आहे. 24 वॉर्डांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असेल. लसीकरण केंद्रांवर गेल्यावरच नोंदणी करता येणार असुन सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत लस घेता येणार आहे.
नाकावाटे दिली जाणारी ही इन्कोव्हॅक लस बूस्टर डोस म्हणून घेतली जाऊ शकते, ज्यांनी आधी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड घेणारे लोक घेऊ शकतात. २८ दिवसांच्या अंतराने हे दोन्ही नाकपुड्यांमध्ये घ्यावे लागतील. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने जर बुस्टर डोस घेतला असेल त्या त्या व्यक्तीला ही लस घेता येणार नाही. मात्र ज्यांना बुस्टर डोस मिळाला नाही त्यांना ही लस घेता जाईल. या लसीला २३ डिसेंबर रोजी मान्यता दिली होती. ही लस 60 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना घेण्यात येणार आहे. कोरोनाचे दोन डोस झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी घेता येणार आहे. दुसऱ्या डोसला सहा महिने पूर्ण झाल्यनंतरच ही लस घेता येणार आहे
काही दिवसांपुर्वी भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहगे. नाकातून (सुईशिवाय) दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे.