वरवंड : दरवर्षी यात्रा उत्सवात तीन वेळा तमाशा ठेवण्यापेक्षा फक्त एकवेळ तमाशा ठेऊन उर्वरित तमाशाच्या खर्चात स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारणे सहज शक्य आहे. ग्रामीण भागातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी अभ्यास केंद्र उभारण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून गावाने पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले.
वरवंड येथील ग्रामदैवताचा यात्रा उत्सव सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वरवंड यात्रा कमिटी व यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच मिनाक्षी दिवेकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप, पोलिस पाटील किशोर दिवेकर, एम. डी. फरगडे, गोरख दिवेकर, सुनिल सातपुते, अशोक फरगडे, मारुती फरगडे, सुंदर रणधीर व ग्रामस्थ उपस्थित होते.
[blockquote content=”यात्रा काळात काही हुल्लडबाजी करणाऱ्या व्यक्तींचा महिला तसेच मुलींना नाहक त्रास सहन करावा लागतो. असे प्रकार गर्दीच्या ठिकाणी घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. हि बाब लक्षात घेऊन यात्रेतील पाळणे, तसेच तमाशा कार्यक्रम स्थळावर आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दोन दिवसांसाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. ” pic=”” name=”-किशोर दिवेकर, पोलीस पाटील. “]
-भुयारी मार्गाची प्रश्न काढू सुटणार
मागील काही दिवसांपासून महामार्गावरची वरवंड येथील अरुंद भुयारी मार्ग हा वाहतूक कोंडीची समस्या बनला आहे. यामुळे वरवंडकर वाहतूक कोंडीच्या नव्या समस्येत गुंतला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी वारंवार चर्चा करण्यात आली आहे.तसेच त्यांचाही याबाबत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगतात. मात्र त्यांच्या या पाठपुराव्याला यश केव्हा मिळणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.






