सातारा : ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे यांनी केलेले सर्व आराेप उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी फेटाळून लावले आहेत. अंधारेंनी आपले वक्तव्य २४ तासांत मागे घ्यावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे, असा इशारा देसाई यांनी अंधारे यांना दिला आहे.
सुषमा अंधारेंचे वक्तव्य हास्यास्पद
शंभूराज देसाई साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सुषमा अंधारे यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र ही संबंध नाही. त्यामुळे बेजबाबदार वक्तव्य करुन त्या समाजात माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करीत आहेत.
चर्चा करुन पुढची कायदेशीर कारवाई करणार
माझ्या कायदेशीर सल्लागाराशी चर्चा करुन पुढची कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. दरम्यान आम्हांला (दादा भुसे आणि मला) बदनाम करण्याचे काम तात्काळ अंधारेंनी थांबवावे असेही मंत्री देसाईंनी स्पष्ट केले.
आम्हाला बदनाम करण्याचे काम
त्यांचावर लवकरच माझ्या कायदेशीर सल्लागाराशी चर्चा करून पुढची कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. मात्र, त्यांनी आम्हाला बदनाम करण्याचे काम तत्काळ थांबवावे, असेही देसाई यांनी सांगितले आहे.
काय म्हणाल्या होत्या अंधारे
ललिल पाटील प्रकरणाचा तपास करायला हवा. या प्रकरणात राजकीय लोक आहेत. दादा भुसे, शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी अंधारे यांनी केली. आज देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत. ललित पाटील ने ज्या हॉटेलमधून पलायन केले, त्याच लेमन ट्री हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्या हॉटेलमध्ये बैठक होणार आहे असे त्या म्हणाल्या राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ललित पाटीलचा जय सिंघानिया होऊ नये, असा टोला देखील अंधारे यांनी लगावला होता.
Web Title: Shambhuraj desai refutes all allegations of sushma andhare but my mole has nothing to do with lalit patil case nryb