शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेत पुन्हा एकदा अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधी विषयी भाष्य केलं.
‘माझ्या हातात राज्याची सत्ता होती अनेक पद द्यायचा अधिकार होता, तुम्हाला मंत्री केलं, बाकीच्या अनेकांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं. पण एखादं सुद्धा पद स्वतःच्या मुलीला दिलं नाही. घर एकत्र ठेवलं पाहिजे. सगळे अधिकार त्यांना दिले होते.’; अशा शब्दात शरद पवारा यांनी अजित पवार याचं नावं न घेता टोला लगावला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या युगेंद्र पवार यांच्या प्रचाराला कन्हेरी येथून आज प्रारंभ झाला. यावेळी शरद पवार बोलत होते.
‘एकाने शेती आणि दुसऱ्याने नोकरी करावी असं माझं धोरण आहे. त्यामुळेच आम्ही अनेक कारखाने उभारले. मलिदा गँग काय भानगड आहे आम्हाला माहिती नाही. आम्ही अशी गँग बनवली नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बारामती पॅटर्न हा शब्द वापरला होता. राज्य चालवण्याची जबाबदारी मी तरुण पिढीवर दिली आहे. राजकारणात कधी यश येतं तर कधी अपयश. पण सहकाऱ्यांची कधी साथ सोडायची नसते. सत्ता नसताना आमच्या सहकाऱ्यांनी उद्योग केला, पहाटे उठले आणि राज्यपालांना झोपेतून उठवलं आणि शपथ घेतली. याचा परिणाम काय झाला? सरकार ४ दिवस टिकलं. इथलं काम ज्यांच्या हातात दिलं त्यांनी पक्ष घेतला आणि दुसरीकडे जाऊन बसले, अशी खंत शरद पवार यांनी बोलून दाखवली.
हेही वाचा- हा पठ्ठ्या कधी पवार साहेबांना सोडणार नाही…; पहिल्याच भाषणात युगेंद्र पवारांनी जिंकली मनं
‘मी कधीही त्यांच्या म्हणण्याविरोधात कधी भूमिका घेतली नाही. याआधी माझ्या हातात सत्ता होती अनेक पद देण्याचा अधिकार होता, त्यांना मंत्री केलं, अनेकांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं पण कधी एक पद स्वतःच्या मुलीला दिलं नाही. घर एकत्र ठेवलं पाहिजे, पण सगळे अधिकार त्यांना दिले होते. राज्यात आम्ही पक्ष काढला गेले अनेक वर्ष राजकारणात आहे. तुम्ही लोकांनी साथ दिली. उपमुख्यमंत्री बनवलं. अनेक वर्ष निवडून गेले.
हेही वाचा-Maharashtra Election 2024: वडगाव शेरीत भाजपच्या जगदीश मुळीकांचा यू-टर्न; देवा भाऊंचा एक फोन आणि…
‘राष्ट्रवादी पक्ष मी काढला? चिन्ह कोणाचं होतं? आमचं. मात्र काही लोकांनी आम्हाला कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावल्या. मी कधी समन्स पहिला नव्हता. पण कोर्टात तुम्ही हजर रहा असे समन्स माझ्या नावाने काढले. उभ्या आयुष्यात कधी कोर्टात गेलो नाही. कोर्टाने निर्णय दिला की पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलं. पक्ष पळवला, चिन्ह पळवलं. आज बारामतीत विकास केला असं सांगितलं जातं. त्यात अजित पवारांचा हात असेल. विकासात विरोधकांचा हात असेल तरी त्यांचं नाव घेतलं जातं. असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.