Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय राऊतांचा घणाघात;’गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यसरकार…’

शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 'गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यसरकार' अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 09, 2024 | 03:11 PM
संजय राऊतांचा घणाघात;’गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यसरकार…’
Follow Us
Follow Us:

मुंबई : मागील काही दिवसांमध्ये राजकारणामध्ये वाढत्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सहभाग चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक राजकारण्यांचे गुंडांसोबतचे फोटो, मंत्रालयातील गुंडांची व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच राजकीय वादातून थेट गोळ्या झाडून हत्या केली जात आहे. या सर्व प्रकारावर राजकारण तापले असून गृहमंत्री (DCM Devendra Fadnavis) व मुख्यमंत्र्यांवर (CM Eknath Shinde) विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर आता शिवसेनेचे (Shivsena) खासदार व प्रवक्ते संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी टीका करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ‘गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यसरकार’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे.

वाढत्या गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा राजकारणातील हस्तेक्षेपावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “मंत्रालयात गुंड मुख्यमंत्री व त्यांच्या बाळराजांना भेटायला येत आहेत. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स हे गुंड व माफिया लावत आहेत. अनेक कॉन्ट्रॅक्ट्स गुंडांना दिले जातात. 8 हजार कोटींचे ऍम्ब्युलन्सचे कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळाले आहे ? त्यामध्ये किती माफिया सहभागी आहेत हे लवकरच बाहेर येईल. शिंदे यांच्या टोळीमध्ये गुंड व पोलिस एकाच टोळीत आहेत.कल्याणला गणपत गायकवाडांनी गोळीबार केला. त्यात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंचे नाव आले होते.एकनाथ शिंदेंची पोलिसांनी लगेच चौकशी करायला हवी होती. दुसरे कोणी असते तर त्याची चौकशी केली असती. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते पण महाराष्ट्रात गुंडाना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री यांना जाब विचारला जात नाही. गेल्या काही दिवसांपासून गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यसरकार” अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

फडणवीस हे अतिशय अपयशी व अकार्यक्षम गृहमंत्री

ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “काल घोसाळकरांची निर्घुण हत्या झाली आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे कधीच घडले नाही. पुणे, नगर, राहौरी इथे हत्या झाल्या आहेत पण, आता मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली आहे. पण आता राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत? आता ते अदृश्य झाले आहेत. गृहमंत्री विदर्भात ‘चाय पे चर्चा’ करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा कधी होणार ? अतिशय अपयशी व अकार्यक्षम गृहमंत्री आहात. आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला महाराष्ट्रात नवीन खून करण्याची सुपारी घ्यायला गेले आहेत का ?” असा गंभीर सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला. “नरेंद्र मोदी व अमित शाह हे या राज्याचे गुन्हेगार व अपराधी आहेत. त्यांनी हे सरकार महाराष्ट्रावर लादलेले आहे. हे सरकार बरखास्त करा व राष्ट्रपती राजवट लावा. तुमचे आमदार,खास पोलिसांना धमक्या देत आहेत.याला कायद्याचे राज्य म्हणतात का ?” अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली.

Web Title: Shiv sena mp sanjay raut targeted fadnavis and eknath shinde for murder in maharashtra nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2024 | 03:11 PM

Topics:  

  • Abhishek Ghosalkar Murder Case
  • Cm Eknath Shinde
  • DCM Devendra Fadnavis
  • maharashtra
  • MP Sanjay Raut
  • shivsena

संबंधित बातम्या

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…
1

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
2

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
3

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
4

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.