Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Crisis : पाणीटंचाईने नागरिक हैराण; मिरा-भाईंदरमध्ये पाणीप्रश्नी शिवसेनेचा इशारा, ९ जूनला महिलांचा ‘टमरेल मोर्चा’

Mira Bhayandar water crisis : मिरा-भाईंदर शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत ९ जून रोजी महिलांचा ‘टमरेल मोर्चा’ काढण्याचा इशारा दिला आहे. महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 05, 2026 | 03:18 PM
पाणीटंचाईने नागरिक हैराण; मिरा-भाईंदरमध्ये पाणीप्रश्नी शिवसेनेचा इशारा, ९ जूनला महिलांचा ‘टमरेल मोर्चा’

पाणीटंचाईने नागरिक हैराण; मिरा-भाईंदरमध्ये पाणीप्रश्नी शिवसेनेचा इशारा, ९ जूनला महिलांचा ‘टमरेल मोर्चा’

Follow Us
Follow Us:

विजय काते, भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर 4 जून 2026 ला काँग्रेसमार्फत मटका फोड आंदोलन करण्यात आले. यावर आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या ९ जून रोजी महिलांचा ‘टमरेल मोर्चा’ काढण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन सादर करून तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहरातील अनेक भागांमध्ये अपुरा, कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी सलग तीन ते चार दिवस पाणी मिळत नाही. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. महानगरपालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

मिरा रोड ड्रग्ज प्रकरणात मोठा पर्दाफाश; तेलंगणातील MD कारखाना उद्ध्वस्त, 6.22 कोटींचा मुद्देमाल जप्त

शिवसेनेने प्रशासनाकडे शहरातील सर्व भागांमध्ये नियमित आणि समान पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. ज्या भागांमध्ये तीव्र टंचाई आहे, तेथे महानगरपालिकेच्या खर्चाने मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच पाणीपुरवठ्याचे प्रभागनिहाय वेळापत्रक जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करून पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन अतिरिक्त पाणी कोट्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून दीर्घकालीन नियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या ९ जून रोजी शेकडो महिला आणि नागरिकांच्या सहभागाने महापालिकेवर ‘टमरेल मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. या मोर्चाद्वारे आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचे निशा नार्वेकर यांनी सांगितले. प्रशासनाने ९ जूनपूर्वी ठोस पावले उचलावीत, अन्यथा आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या जनक्षोभाची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

मीठागरांच्या मालकी हक्कासाठी उत्पादकांचा एल्गार! न्यायालयीन लढा सुरू; सरकारने हस्तक्षेप करून तातडीने न्याय देण्याची मागणी

Web Title: Shiv sena warns tamrel morcha over water crisis in mira bhayandar news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Shiv Sena
  • Water Crisis

संबंधित बातम्या

MBMC Schools: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर
1

MBMC Schools: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
2

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

SIR Form Controversy: SIR फॉर्म प्रकरणावरून खळबळ! मतदारांचे SIR फॉर्म सफाई कर्मचाऱ्याकडे कसे? तेजस्वी पाटील यांचा गंभीर सवाल
3

SIR Form Controversy: SIR फॉर्म प्रकरणावरून खळबळ! मतदारांचे SIR फॉर्म सफाई कर्मचाऱ्याकडे कसे? तेजस्वी पाटील यांचा गंभीर सवाल

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
4

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.