पनवेल ग्रामीण : सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचे लक्ष्य आहे ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकडे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. त्यामुळे कोणता पक्ष किती पॉवर दाखवेल? कोण किती प्रचार करेल? लोकसभा निवडणुकीमध्ये कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान करण्यात आलेल्या फटाक्याणच्या आतिषबाजीमुळे भगव्या झेंड्याला आग लागण्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी ( ता.28) कामोठे वसाहतीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेपूर्वी वसाहतीत बाईक रॅली काढण्यात आली होती वसाहतीमधील एमएन आर चौकात रॅली आली असता उमेदवाराच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या फाटक्यांच्या आतिषबाजीमुळे चौकात लावण्यात आलेल्या भल्यामोठ्या भगव्या झेंड्याला आग लागली.