अकोला : गेल्या काही दिवसापासून एलसीबीच्या कारवायांना वेग आला आहे. सोयाबीन फॅक्टरीतून सहा वेळा सोयाबीन चोरणा-या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
[read_also content=”महसूल कर्मचारी आता बेमुदत संपावर, जिल्ह्यातील कामकाज ठप्प https://www.navarashtra.com/maharashtra/revenue-workers-now-on-indefinite-strike-work-in-the-district-stalled-nraa-264105.html”]
रिधोरा जवळच्या गुजरात अंबुजा फॅक्टरीतून ३२५ क्विंटल सोयाबीन चोरी गेल्याची तक्रार दोन एप्रिल रोजी बाळापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांनी पीएसआय मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार केले. या पथकाने तीन एप्रिल रोजी शेगाव येथील विठ्ठल मेहंगे, देवानंद मेहंगे, अविनाश मेहंगे यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, विविध ठिकाणाहून सोयाबीन चोरल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांच्या घरासमोर सोयाबीनने भरलेला एम.एच.०४ जी.एफ. २२८४ क्रमांकाचे वाहन उभे होते. हा माल गुजरात अंबुजा फॅक्टरीमधून सहा वेळा चोरी केल्याची कबुली दिली. अभिलेख पडताळणी केली असता, बाळापूर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे, बार्शिटाकळी, बोरगावमंजू, पिंजर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
[read_also content=”एक सामूहिक बलात्कारातून गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये फोनवॉर, नागपुरात टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता https://www.navarashtra.com/maharashtra/two-gangs-of-criminals-involved-in-gang-rape-phone-war-possibility-of-gang-war-in-nagpur-nraa-263993.html”]
सहा गुन्ह्यात चोरी गेलेले २८ लाख १३ हजारांचे ४३० क्विंटल सोयाबीन, गुन्ह्यात वापरलेले पाच लाख रुपयांचे एम.एच.०४ जी.एफ. २२८४ क्रमांकाचे वाहन, १० लाख रुपयांची एमएच ३० ए.झेड ७६७१ क्रमांकाची महिंद्रा कार, ४८ हजारांचे मोबाईल असा एकूण ४३ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मुकुंद देशमुख, दत्ता ढोरे, श्रीकांत पातोंड, संदीप ताले, रवी पालीवाल, गोपीलाल मावळे, शेर अली, अनिता टेकाम, अक्षय बोबडे, विजय कबले यांनी केली.