Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus News : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महत्त्वाची बातमी; १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य, जाणून घ्या नियम

ST Bus News: एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 31, 2026 | 06:57 PM
एसटीला एकूण 10324 कोटींचा तोटा; तोट्यातील मार्ग ते ई-बसपर्यंतच्या पैलूवर २ दिवस विचारमंथन

एसटीला एकूण 10324 कोटींचा तोटा; तोट्यातील मार्ग ते ई-बसपर्यंतच्या पैलूवर २ दिवस विचारमंथन

Follow Us
Follow Us:
  • १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक व महिलांना NCMC कार्ड आवश्यक
  • सवलतीचे तिकीट NCMC कार्डद्वारेच वितरित केले जाणार
  • ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना काही काळ मुदतवाढ
 

ST Bus News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचन आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून राज्य शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना NCMC कार्डद्वारेच सवलतीचे तिकीट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशांनी NCMC कार्ड प्रवास करताना सोबत ठेवण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

महामंडळाच्या परिपत्रकानुसार, विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा देण्यात येते. या प्रवाशांसाठी NCMC कार्डची नोंदणी व वितरण करण्याचे काम महामंडळाने सुरू केले आहे. यासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लि. यांची NCMC कार्ड नोंदणी व वितरणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांचे NCMC कार्ड नोंदणी व वितरणाचे काम सुरू आहे. त्यानंतर इतर सवलतधारक प्रवाशांसाठीही NCMC कार्ड नोंदणी व वितरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ, पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण; आगारातील बसेसची संख्या तब्बल…

१ सप्टेंबरपासून NCMC कार्ड आवश्यक

एसटी महामंडळाकडून देण्यात आलेले NCMC कार्ड ६५-७५ वर्षापर्यंत चे ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना १ सप्टेंबर २०२६ पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. या तारखेपासून ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना शासनाच्या सवलतीचा लाभ घेताना सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित करण्यात येणार आहे.

याशिवाय, एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या संबंधित प्रवाशांनी NCMC कार्डचे Top-up (रक्कम भरणे) करून घेणे आवश्यक आहे. याबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) संबंधित आगारांना पाठविण्यात आली आहे.

प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, एसटी महामंडळाने केले आवाहन

त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ सप्टेंबरपूर्वी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून NCMC कार्डची नोंदणी व वितरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, तसेच कार्डमध्ये आवश्यक रक्कम Top-up करून ठेवावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

MSRTC Ganpati special Buses: गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना गुड न्यूज; एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द

अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणजे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे (हाताचे ठसे न उठणे ) त्यांच्या विषयी सक्ती करण्यास काही काळ वाढवून दिला आहे. प्रवाशांनी ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी NCMC कार्डची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

Web Title: St bus news ncmc card mandatory senior citizens women from september 1 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • MSRTC Bus
  • Pratap Sarnaiik
  • ST News

संबंधित बातम्या

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय
1

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय

Cancer: कॅन्सरच्या महागड्या तपासणीचा खर्च वाचणार! महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
2

Cancer: कॅन्सरच्या महागड्या तपासणीचा खर्च वाचणार! महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
3

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय
4

‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.