photo credit -social media
मुंबई: 12 वीच्या प्रश्नपत्रिकेत (12th class question paper) चुकीचे प्रश्न छापणाऱ्या बोर्डानं आता 10 वीच्या प्रश्नपत्रिकांतही (10th class question paper ) चुकीचे प्रश्न छापलेत. सोमवारी झालेल्या 101 वीच्या गणित-1च्या प्रश्नपत्रिकेत चौथ्या क्रमांकाच प्रश्न चुकीचा असल्याचं काही शिक्षक सांगतायेत. प्रश्न क्रमांक 4 च्या तिसऱ्या प्रश्नात वर्ग हा शब्दच छापण्यात आलेला नाही. यामुळे प्रश्नपत्रिका सोडवताना विद्यार्थ्यांचा संभ्रम झाला, असा दावा करण्यात आलाय. बोर्डानं ही चूक हिंदी माध्यमाच्या गणित-1 च्या प्रश्नपत्रिकेतच केलेली आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न योग्य रितीनं छापण्यात आलाय.
[read_also content=”सख्ख्या मुलीच्या मैत्रिणीचं केलं लैंगिक शोषण, सातवीतल्या मुलीची आत्महत्या, भाजपा नेत्याच्या कॉल डिटेल्समध्ये हे काय आलं समोर? https://www.navarashtra.com/crime/bjp-leader-physically-abuse-daughters-friend-she-commits-suicide-nrps-375960.html”]
प्रश्नातून महत्त्वाचा शब्दच गायब झाल्यानं विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवायचा कसा, असाच प्रश्न पडला. आता या प्रश्नाचे पूर्ण मार्क बोर्डानं विद्यार्थ्यांना द्यायला हवेत, अशी मागणी होते आहे. इतर काही शिक्षकांच्या मते हिंदीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेत काही मराठी शब्दही छापण्यात आल्याचा आक्षेप नोंदवण्यात आलाय.
21 फेब्रुवारीला झालेल्या 12 वीच्या इंग्रजीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तरचं छापण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी या प्रकरणात केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोर्डाकडून समिती गठित करण्याता आली, समितीनंही यात चूक झाल्याचं बोर्डाला सांगितलं. या चुकीच्या प्रश्नाचं उत्तर लिहिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे गुण देण्याचा निर्णय बोर्डानं घेतलाय.
बारावी आणि दहावीच्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये एखादवेळला चूक होणं हे समजू शकतो. मात्र सातत्यानं अशा चुका होत असतील तर बोर्ड आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कामावर यामुळं प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. सुरुवातीलाच या प्रश्नपत्रिकांची योग्य तपासणी केली असती तर या चुका टाळणं शक्य होतं. भविष्यात अशा चुका घडू नयेत, यासाठी बोर्डानं अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होते आहे.