छगन भुजबळांच्या नाशिकच्या पालकमंत्रीपदाला सुहास कांदेंचा विरोध
Nashik News: नाशिक जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतल वाद अद्यापही काय आहे. १५ ऑगस्टला ध्वजारोहणावरूनही मंत्री गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यातील नाराजीनाट्य समोर आले होते. त्यातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे दिसत आहे. पण त्याचवेळी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मात्र भुजबळ यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध केला आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार असल्याने राष्ट्रवादीचा पालकमंत्री झाला पाहिजे असा दावा भुजबळ यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीचे सात आमदार असले तरी ते भुजबळांसोबत नाहीत, असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे. नाशिकचे पालकमंत्री म्हणून भुजबळ यांच्या नावाला माझा विरोध आहे. असही सुहास कांदेंनी म्हटलं आहे.
सुहास कांदे म्हणाले की, राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत, असं तुम्ही म्हणता, पण ते तुमच्यासोबत आहेत का, ते एकदा तपासून पाहा, पालकमंत्री जरी मुख्यमंत्री साहेब ठरवणार असले तरी माझा स्वत:चा भुजबळ साहेबांना व्यक्तिगत विरोध आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या आमदारांचाही भुजबळांच्या पालकमंत्रीपदाला विरोध आहे. भुजबळांसोबत आज एकही आमदार नाही, ते एकटेच आहेत. असंही कांदेंनी म्हटलं आहे.
याशिवाय पालकमंत्रीपदासाठी सुहास कांदे यांनी तुमच्या नवाला विरोध केला आहे, असा सवाल विचारला असता, मला याबाबत काहीही बोलायचं नाही, असं म्हणत भुजबळांनी सुहास कांदेंकडून होणाऱ्या विरोधावर बोलणे टाळले. दरम्यान सुहास कांदेंवर प्रतिक्रीया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाठ म्हणाले की, मुख्यमंत्री पालकमंत्रीपदाचा निर्णय घेतील, पालमंत्रीपदासाठी वरिष्ठ आहेत. त्यांचा जो काही सामुहिक निर्णय होईल, तो सर्वांना मान्य असेल. त्यामुळे वाद करण्यात काही अर्थ नाही.
दरम्यान, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक सात आमदार आहेत, त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री हा राष्ट्रवादीचाच असायला हवा, रायगडमध्ये एक जागा असतानाही आपण एवढी ताकद लावत आहेत, तर नाशिकमध्ये सात आमदारांसाठीही तेवढी ताकद लावा, असे आवाहन भुजबळानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केलं आहे.
राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. त्यातच नाशिकच्या पालकमंत्रीपदावर अजित पवार गटाचा हक्क असल्याचे छगन भुजबळ सांगत आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काय असतानाच १५ऑगस्टला मंत्री गिरीश महाजन यांना स्वातंत्र्यदिनी नाशिक येथे ध्वजवंदनाची संधी देण्यात आली. तर छगन भुजबळांना गोंदिया जिल्ह्याच्या ध्वजवंदनास जाण्यास सांगण्यात आले. पण सुरूवातीला प्रकृतीचे कारण सांगत त्यांनी गोंदियाच्या ध्वजावंदनास नकार दिला. पण नंतर जे करायचे ते नाशिकमध्येच, असं बोलत त्यांनीनाराजी त्यांनी व्यक्त केली होती.