राष्ट्रवादी एकत्र असताना आम्ही सर्वांत जास्त जागा जिंकत होतो; मंत्री छगन भुजबळ (संग्रहित फोटो)
नाशिक : आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण ते ब्रिटिश सरकारपासून मिळवायचे होतं असे नाही, तर गरिबीसाठी पण मिळवणं गरजेचं होतं. स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी आहे. विशिष्ट लोकांना स्वातंत्र्य मिळालं असं म्हणावं. शेवटचा मनुष्य सुखी होईल तेव्हा खऱ्याअर्थाने स्वातंत्र्य मिळालं, असं म्हणता येईल, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘आता निवडणुका आहे, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आहे. पक्ष किती मोठा याची मोजणी किती ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद जिंकणार त्यावर असणार आहे. राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सर्वात जास्त जागा जिंकत होतो. या नवीन परिस्थितीत आपल्या आव्हान स्वीकारावा लागणार आहे. लोकांपर्यंत किती पोहचले त्यावर सर्व अवलंबून राहावं लागणार आहे. एका जातीवर निवडणुका जिंकता येत नाही. सगळ्यांनी मिळून मागच्या निवडणुका जिंकल्या, पुढच्या काळात तेच करावं लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच छगन भुजबळ नाशिकमध्ये का येतात? गोंदिया जिल्ह्यात का जातात? मला मागच्या काळात धुळे जिल्ह्यात पालकमंत्रिपद देत होते. पण मी सांगितलं जे करेल ते नाशिकमध्ये. आज आपण बघतोय झोपडीवर तिरंगा फडकतोय तो खरा आनंद. अध्यक्ष अजित पवार आहेत, आम्ही सर्व करू. पण तुम्ही काय करणार हे बघणं महत्त्वाचे आहे. शेवटच्या माणसापर्यंत काळजी घ्या, घर, शिक्षण, आरोग्य त्याची काळजी घ्या…लोक तुमच्या सोबत येतील, असे त्यांनी सांगितले.
देशासाठी काम करावं लागेल
याशिवाय, आपण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं. त्यात तुम्ही सर्व ऐकलं असेल. भारत अनेक भाषेचा, धर्माचा, जातींचा आहे. पंतप्रधान यांनी सांगितले त्यासाठी आपण सर्व देशासाठी काम करावं लागेल. भारत बलवान करावा लागेल. स्री-पुरुष या सर्वांनी काम करावं लागेल. कर्तव्य पार पाडावं लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.