वर्धा : चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वसतिगृह अधीक्षक संजय इटनकर (Hostel Superintendent Sanjay Itankar ) याच्यावर हिंगणघाट पोलिसांनी पास्कोअंतर्गत (Pasco by Hinganghat Police) गुन्हा दाखल केला. सोमवारी आरोपीस अटक करून भद्रावती पोलिसांच्या (Bhadravati Police) ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी रमाबाई आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली.
सदर अल्पवयीन मुलगी ही हिंगणघाट येथील रहिवासी असून, तिने एक महिन्यापूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur district) रमाबाई आदिवासी आश्रमशाळेत (Ramabai Adivasi Ashram School) आठव्या वर्गात प्रवेश घेतला. पीडितेच्या आई – वडीलाना फोन करून तुमची मुलगी आजारी असल्याचे सांगितले. मुलीचे आई-वडील आश्रमशाळेत पोहचल्यानंतर त्यांना मुलगी भयभीत आढळून आली. गावी आणल्यानंतर पीडितेवर अत्याचार झाल्याचे समजले.
अधीक्षक इटनकर (Superintendent Itankar) याने पीडितेला याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ती बोलण्यास घाबरत होती. हिंगणघाट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेले असता तेथील कर्मचा-यांकडून माहिती देण्यास उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच हिंगणघाट पोलिसांनी रिपोर्ट (Hinganghat Police Report) घेण्यास टाळाटाळ केली, असा आरोपी भाजपच्या वतीने करण्यात आला. आमदार समीर कुणावार यांना माहिती मिळाल्यानंतर ते रुग्णालयात गेले. त्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागल्याचे सांगितले.
आरोपीवर कडक कारवाई करून पीडिताला न्याय द्यावा. समिती नियुक्त करून आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी, विद्यार्थिनीचे काँन्सलिंग करावे व शाळा व्यवस्थापनाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, भाजप महिला आघाडीच्या अर्चना वानखेडे, वैशाली येरावार, श्रेया देशमुख, अनिता मावळे, अनिता उगे, चंदाताई फुसाटे आदींची उपस्थिती होती.