फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई : विधीमंडळाचे अधिवेशन सध्या गाजते आहे. यामध्ये विधान परिषदेमध्ये विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवराळ भाषा वापरली. त्यामुळे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर सभागृहामध्ये विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्याचा ठराव मंजूर झाला. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाच दिवस निलंबित केले होते. मात्र दिलगिरीच्या पत्रानंतर दानवे यांच्या निलंबनाचे दिवस कमी करण्यात आले आहेत.
अंबादास दानवे यांचे विधान परिषदेच्या सभागृहातून पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले. यामुळे विरोधक आक्रमक झाले. हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा डाव असल्याचा आरोप देखील करण्यात आला. सभागृहामध्ये शिवराळ भाषा वापरल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर माफी मागितली. तसेच अंबादास दानवे यांनी देखील उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेत दिलीगिरी व्यक्त करणारे पत्र दिले. तसेच सभागृहामध्ये देखील दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दाखवली. या विनंतीनंतर अखेर अंबादास दानवे यांचे निलंबन कमी करण्या आले आहे. उद्यापासून विधान परिषदेमध्ये विरोधीपक्षनेते म्हणून अंबादास दानवे पुन्हा एकदा उपस्थित राहणार आहेत.
नेमंक घडलं काय?
राज्याच्या विधीमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये लोकसभेचा मुद्दा चर्चेला आणला जात होता. भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणावर निषेध व्यक्त करण्याचा ठराव मांडण्यात यावा, अशी मागणी यांनी विधान परिषदेत केली. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते यावर अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, असं दरेकर म्हणाले. मग अंबादास दानवे बोलायला उभे राहिले. संबंधित विषय हा लोकसभेतला आहे. त्यावर इथं चर्चा होणं अपेक्षित नाही. मात्र यावरुन एकच गोंधळ सुरु झाला. दावने यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यांच्या या वक्तव्याला प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी कारवाई करत दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं.