• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Telangana Cm Kcr To Visit Pandharpur Before Maharashtra Cm Eknath Shinde Nrsr

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपुरात येणार, 300 गाड्या पंढरपुरात येणार, 27 तारखेला वाखरीत रिंगण सोहळ्यावर करणार पुष्पवृष्टी, मुख्यमंत्री शिंदेंवर कुरघोडीचा प्रयत्न

मराठा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पक्षात येण्याचं आवाहन करत असताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा केसीआर यांचा प्रयत्न दिसतोय. तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव बदलून त्यांनी ते भारत राष्ट्र समिती केलं आहे. देशाच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपाला पर्यायी सरकार देण्याचा केसीआर यांचा मानस आहे.

  • By साधना
Updated On: Jun 22, 2023 | 11:43 AM
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपुरात येणार, 300 गाड्या पंढरपुरात येणार, 27 तारखेला वाखरीत रिंगण सोहळ्यावर करणार पुष्पवृष्टी, मुख्यमंत्री शिंदेंवर कुरघोडीचा प्रयत्न
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंढरपूर: राज्याच्या आगामी निवडणुकांत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR In Pandharpur) यांची भारत राष्ट्र समिती (BRS) महाराष्ट्रात पाय रोवण्याच्या तयारीत आहेत. मराठवाडा आणि विदर्भात पक्षानं पाय रोवण्यास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी संघटनेचे नेते मोठ्या प्रमाणात या पक्षात प्रवेश करतायेत. मराठवाड्यातून केसीआर लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या संख्येनं पक्षाच्या सभा होतायेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. त्याच पार्श्वभूमीवर आता पंढरपुरात आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2023) आदल्या दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) या वर्षी महापूजा करण्यासाठी 28 तारखेला पंढरपुरात पोहचतील. त्याच्या एक दिवस आधी 27 तारखेला केसीआर हे पंढरपुरात असणार आहेत. 26 तारखेला त्यांच्या मंत्रिमंडळासह ते सोलापुरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासाठी 300 गाड्या तैनात असणार आहेत. केसीआर 27 तारखेला पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतील आणि नंतर वाखरीत होणाऱ्या शेवटच्या माऊलीच्या रिंगणावर ते पुष्पवृष्टी करणार आहेत. आळंदीत वारकऱ्यांवर जो लाठीमार झाला, त्याचा निषेध करण्यासाठी ही पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.

केसीआर यांची राजकीय खेळी
मराठा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पक्षात येण्याचं आवाहन करत असताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा हा केसीआर यांचा प्रयत्न दिसतोय. तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव बदलून त्यांनी ते भारत राष्ट्र समिती केलं आहे. देशाच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपाला पर्यायी सरकार देण्याचा केसीआर यांचा मानस आहे. या लढाईची सुरुवात ते महाराष्ट्रातून करतायेत. स्थानिक स्वराज्य संस्था, विधावसभा, लोकसभा निवडणुका त्यांच्या पक्षामार्फत लढवण्यात येणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 10 कोटी रुपरये खर्च करण्याची त्यांची तयारी असल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्रात प्रबळ पक्ष होण्याची त्यांची तयारी सुरु आहे, यातून ते भाजपा-शिंदे गट आणि मविआ यांच्यापुढं आव्हान निर्माण करण्याची रणनीती आखतायेत,असं सांगण्यात येतंय. राष्ट्रवादीचे अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही नुकताच राष्ट्रवादी सोडून बीआरएसमध्ये प्रवेश केलेला आहे. राज्यात पाय रोवण्यासआठी ते वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीही काढणार असल्याची माहिती आहे.

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न
दरवर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहकुटुंब आषाढी एकादशीला पंढरपुरात महापूजा करतात, मात्र त्यावेळी संपूर्ण मंत्रिमंडळ कधीही हजर नसते. मात्र केसीआर त्यांच्या संपूर्ण मंत्रिमडळाला घेऊन पंढरपुरात येणार आहेत. यामुळे व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. लाखो वारकरी पंढरपूर परिसरात असताना, पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण असतो. अशा स्थितीत केसीआर यांना पंढरपुरात येण्याची परवानगी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधी पंढरपुरात येऊन त्यांना मात देण्याचा प्रयत्न केसीआर यांचा दिसतोय. वारकरी संप्रदायात मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्यानं त्यांनी आषाढीची संधी साधल्याचं मानण्यात येतंय. यातून त्यांना मोठी प्रसिद्धीही महाराष्ट्रात मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Telangana cm kcr to visit pandharpur before maharashtra cm eknath shinde nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2023 | 11:42 AM

Topics:  

  • BRS)

ताज्या बातम्या

पुढे वाचा
UPI चा विक्रमी वेग! 6 महिन्यांत 1572 लाख कोटींचे व्यवहार; ऑक्टोबरमध्ये दररोज 96,000 कोटींची देवाणघेवाण

UPI चा विक्रमी वेग! 6 महिन्यांत 1572 लाख कोटींचे व्यवहार; ऑक्टोबरमध्ये दररोज 96,000 कोटींची देवाणघेवाण

Oct 24, 2025 | 07:59 PM
वानखेडे स्टेडियम येथे नवीन लॉनचे उद्घाटन! शरद पवारांसह अनेक नेत्यांची उपस्थिती

वानखेडे स्टेडियम येथे नवीन लॉनचे उद्घाटन! शरद पवारांसह अनेक नेत्यांची उपस्थिती

Oct 24, 2025 | 07:52 PM
Bhiwandi : आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ‘राजभवन’कडे पायी बिऱ्हाड आंदोलन

Bhiwandi : आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे ‘राजभवन’कडे पायी बिऱ्हाड आंदोलन

Oct 24, 2025 | 07:50 PM
अभिनयासाठी लग्नाचं बंधन तोडलं, बॉलिवूडची ‘ही’ बोल्ड अभिनेत्री 49 वर्षांच्या वयात जगतेय सिंगल लाइफ!

अभिनयासाठी लग्नाचं बंधन तोडलं, बॉलिवूडची ‘ही’ बोल्ड अभिनेत्री 49 वर्षांच्या वयात जगतेय सिंगल लाइफ!

Oct 24, 2025 | 07:49 PM
ICC Womens World Cup 2025  : भारतीय संघ Semifinal मध्ये ‘या’ संघासोबत भिडणार! तारीखही ठरली; वाचा सविस्तर

ICC Womens World Cup 2025  : भारतीय संघ Semifinal मध्ये ‘या’ संघासोबत भिडणार! तारीखही ठरली; वाचा सविस्तर

Oct 24, 2025 | 07:47 PM
Mumbai: काळाचौकी येथे प्रेमाचा रक्तरंजित शेवट! बॉयफ्रेंडच्या चाकू हल्ल्यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; हल्ला करून तरुणाचीही आत्महत्या

Mumbai: काळाचौकी येथे प्रेमाचा रक्तरंजित शेवट! बॉयफ्रेंडच्या चाकू हल्ल्यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; हल्ला करून तरुणाचीही आत्महत्या

Oct 24, 2025 | 07:44 PM
SBI Life: दुसऱ्या तिमाहीत एसबीआय लाईफचा नफा 6 टक्के घसरला; प्रीमियम उत्पन्नात 23 टक्के वाढ असूनही स्टॉक दबावाखाली

SBI Life: दुसऱ्या तिमाहीत एसबीआय लाईफचा नफा 6 टक्के घसरला; प्रीमियम उत्पन्नात 23 टक्के वाढ असूनही स्टॉक दबावाखाली

Oct 24, 2025 | 07:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : सोनई मारहाण प्रकरणाला नवे वळण, गुन्हेगार संजय वैरागरवर SIT चौकशीची मागणी

Ahilyanagar : सोनई मारहाण प्रकरणाला नवे वळण, गुन्हेगार संजय वैरागरवर SIT चौकशीची मागणी

Oct 24, 2025 | 07:23 PM
Bhayandar : समाजसेविकेच्या सतर्कतेमुळे समोर आले अमली पदार्थांचे रॅकेट

Bhayandar : समाजसेविकेच्या सतर्कतेमुळे समोर आले अमली पदार्थांचे रॅकेट

Oct 24, 2025 | 07:16 PM
Navi Mumbai : पैसे घेऊन मतदार यादीत नाव नोंदवणारे अधिकारी कोण? मनसेने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Navi Mumbai : पैसे घेऊन मतदार यादीत नाव नोंदवणारे अधिकारी कोण? मनसेने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Oct 24, 2025 | 07:02 PM
Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Sindhudurg : दिवाळीनिमित्त मळगावात साकारली किल्ले रायगडची हुबेहूब प्रतिकृती

Oct 23, 2025 | 07:47 PM
Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Kolhapur : देशभरात दिवाळीचा उत्साह, कोलोली गावात ऐतिहासिकपणे दिपावली साजरी

Oct 23, 2025 | 07:00 PM
Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Oct 23, 2025 | 04:38 PM
Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Oct 23, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.