Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्चच्या मध्यातच उन्हाचा कडाका वाढला; आरोग्य जपण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्याच

तापमान वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 13, 2026 | 01:00 PM
देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस...

देशातील अनेक भागांत तापमानात वाढ; राजधानी दिल्लीत उष्णतेने 15 वर्षांचा रेकॉर्डच मोडला, पुढील 7 दिवस...

Follow Us
Follow Us:

इंदापूर : इंदापूर तालुक्यात मार्च महिन्याच्या मध्यातच तापमानाने ३८ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने नागरिकांना उष्णतेचा चांगलाच त्रास जाणवू लागला आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागते, तर दुपारच्या सुमारास कडक उन्हामुळे रस्ते आणि बाजारपेठांमधील वर्दळही काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

विशेषतः दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका अधिक असल्यामुळे शेतकरी, बांधकाम मजूर, रस्त्यावर काम करणारे कामगार तसेच बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा अधिक परिणाम होत आहे. तापमान वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे. बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दिवसभरात पुरेसे पाणी पिणे, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रव पदार्थ घेणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. हलके, सैल आणि सूती कपडे वापरणे तसेच दीर्घकाळ उन्हात उभे राहणे टाळणेही गरजेचे आहे.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून, शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वेळोवेळी पाणी पिणे, थेट उन्हात जास्त वेळ राहणे टाळणे आणि प्रकृती बिघडल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.

लिंबू-पाण्यासह थंड पेयासाठी नागरिकांची गर्दी

दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे शहरातील लिंबूपाणी, रसवंतीगृह तसेच विविध शीतपेयांच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. कडक उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून अनेक जण थंड पेयांचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

पुणे शहरातही तापमानात मोठी वाढ

दुसरीकडे, पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने झेप घेतल्याने पुणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. बुधवारी (ता. ११) शहरात किमान १७.५ अंश सेल्सिअस, तर कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हे देखील वाचा : दिलासादायक ! युद्धादरम्यानचं तेल संकट आता लवकरच दूर होईल; 32 देशांनी उघडले आपात्कालीन साठे

Web Title: Temperature rised in indapur be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Climate Change
  • indapur news
  • Weather Update

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
2

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
3

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?
4

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.