Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : कोट्यवधींच्या निविदा, तरी उघडी चेंबर्स कायम! म्हशीच्या घटनेनंतर मिरा-भाईंदर मनपा पुन्हा वादात

भाईंदर (पूर्व) येथील इंद्रलोक परिसरात तपोवन शाळेजवळ उघड्या चेंबरमध्ये पडलेल्या म्हशीची नवघर पोलीस, अग्निशमन दल, युवासेना आणि प्राणीप्रेमींच्या संयुक्त प्रयत्नांतून चार तासांच्या अथक बचाव मोहिमेनंतर सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेनंतर मिरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2026 | 11:12 AM
कोट्यवधींच्या निविदा, तरी उघडी चेंबर्स कायम! म्हशीच्या घटनेनंतर मिरा-भाईंदर मनपा पुन्हा वादात

कोट्यवधींच्या निविदा, तरी उघडी चेंबर्स कायम! म्हशीच्या घटनेनंतर मिरा-भाईंदर मनपा पुन्हा वादात

Follow Us
Follow Us:
  • कोट्यवधींच्या निविदा, तरी उघडी चेंबर्स कायम!
  • म्हशीच्या घटनेनंतर मिरा-भाईंदर मनपा पुन्हा वादात
  • स्थानिक प्राणीप्रेमी तातडीने घटनास्थळी दाखल
 

विजय काते, मीरा भाईंदर : भाईंदर (पूर्व) येथील इंद्रलोक परिसरातील तपोवन शाळेजवळ मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे एका मुक्या जनावराचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (13 जुलै 2026) घडली. उघड्या चेंबरमध्ये एक म्हैस पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. तब्बल चार तास सुरू असलेल्या जीवघेण्या बचाव मोहिमेनंतर नवघर पोलीस, मिरा-भाईंदर अग्निशमन विभाग, शिवसेनेची युवासेना आणि स्थानिक प्राणीप्रेमी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून म्हशीची सुखरूप सुटका करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी, मिरा-भाईंदर अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक प्राणीप्रेमी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चेंबर अरुंद आणि खोल असल्यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत होते. म्हशीला कोणतीही इजा होऊ न देता बाहेर काढण्यासाठी दोरखंड, यंत्रसामग्री आणि विविध तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आला. सलग चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर म्हशीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

Mira Bhayandar News: ‘तू मला ओळखत नाहीस… कुर्ल्यात चौकशी कर’; पार्किंगच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, परिसरात दहशतीचे वातावरण

या बचाव मोहिमेत अग्निशमन विभागाचे प्रशांत हसनाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसाने काम केले. नवघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पाटील, पोलीस शिपाई सुभाष भोये, शुभम धात्रक, निलेश नवले आणि योगेश भोजने यांनीही बचावकार्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. शिवसेनेच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक प्राणीप्रेमींनीही सक्रिय सहभाग घेतला. या सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळे म्हशीचा जीव वाचला. त्यांच्या या कार्याचे स्थानिक नागरिकांनी कौतुक करत आभार मानले.

या घटनेनंतर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील गटारांवर सुरक्षित लोखंडी झाकणे बसवण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जात असतानाही अनेक ठिकाणी मजबूत झाकणांऐवजी तात्पुरत्या लाकडी फळ्या ठेवून काम भागवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे, ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणापासून काही अंतरावर तपोवन शाळा आहे. या उघड्या चेंबरमध्ये एखादा विद्यार्थी, पालक किंवा नागरिक पडला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती. त्यामुळे परिसरातील पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मनपाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व उघडी चेंबर्स आणि धोकादायक गटारे तातडीने शोधून त्यावर सुरक्षित झाकणे बसवावीत, तसेच संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बचाव मोहिमेतील प्रमुख सहभागी

सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे (नवघर पोलीस ठाणे)

पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पाटील

पोलीस शिपाई सुभाष भोये

शुभम धात्रक

निलेश नवले

योगेश भोजने

अग्निशमन विभागाचे प्रशांत हसनाळे व सहकारी

शिवसेनेची युवासेना

स्थानिक प्राणीप्रेमी

Mira-Bhayandar crime: मिरा रोडमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा छापा; महिला दलाल अटकेत, दोन पीडित तरुणींची सुटका

Web Title: Bhayandar buffalo rescued from open chamber near tapovan school mbmc negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • maharashtra
  • mira bhayandar
  • Yuva Sena

संबंधित बातम्या

Matheran News : माथेरानमध्ये दूषित पाणी थेट नळातून? साथीच्या आजारांचा धोका, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Matheran News : माथेरानमध्ये दूषित पाणी थेट नळातून? साथीच्या आजारांचा धोका, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पुनर्विकास प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार! ग्रांट रोड क्लस्टर प्रकल्पाची एसआयटी चौकशी करा; मच्छीमार कृती समितीची मागणी
2

पुनर्विकास प्रकल्पामध्ये आर्थिक गैरव्यवहार! ग्रांट रोड क्लस्टर प्रकल्पाची एसआयटी चौकशी करा; मच्छीमार कृती समितीची मागणी

ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात ‘दुधानी टोळी’ जेरबंद; झाडीझुडपातून थरारक पाठलाग करुन पकडले
3

ग्रामस्थांच्या धाडसामुळे कुख्यात ‘दुधानी टोळी’ जेरबंद; झाडीझुडपातून थरारक पाठलाग करुन पकडले

Matheran News : माथेरान नगरपरिषदेच्या बांधकाम परवानग्या संशयाच्या भोवऱ्यात; महसूल मंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश
4

Matheran News : माथेरान नगरपरिषदेच्या बांधकाम परवानग्या संशयाच्या भोवऱ्यात; महसूल मंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.