कल्याण डोंबिवलीच्या नगररचनाकार पद अद्याप रिक्त; माजी नगरसेवकाचे आयुक्तांना खडेबोल
डोंबिवली-केडीएमसीच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक नगररचनाकार हे पद गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त आहे. या पदावर अद्याप अधिकारी का नेमला जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. रिक्त पदाची नेमणूक करण्यासाठी आयुक्तावर दबाव आहे का ? असाही सवाल भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी उपस्थित केला आहे. हे रिक्त पद भरण्यासाठी सरकारकडे तातडीने पाठपुरावा करुन हे पद भरले जावे अशी मागणी माजी नगरसेवक धात्रक यांनी केली आहे.
मविआला अचानक यायला लागला महायुतीचा पुळका; नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तोंडभरुन कौतुक
नगररचना विभागातील सहाय्यक संचालक नगररचनाकार पदी या पूर्वी दिशा सावंत या कार्यरत होत्या. त्यांची बदली झाली. नाशिकहून एक अधिकारी या पदावर कल्याण डोंबिवलीत येणार होते. मात्र ते आलेच नाही. त्यांनी पदभार हाती घेतला नाही. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. हे पद भरले जात नाही. त्यासाठी आयुक्तांवर दबाव आहे का असा प्रश्न धात्रक यांनी उपस्थित केला आहे. नगररचना विभागातील अनेक अधिकाकरी हे एकाच पदावर गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. त्याची बदली केली जात नाही. सहाय्यक संचालक नगररचनाकार हे पद भरण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करावा अशी सूचना धात्रक यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील प्रशासकीय कामकाजाकडे आयुक्तांचे दुर्लक्ष आहे. महिन्यातील १५ दिवसांनी आयुक्तांनी डोंबिवलीत भेट द्यावी. डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड, दीनदयाल रोड, फुले रोड या परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईक केली जात नाही. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होताे.
फेरीवाल्यामुळे होणारा कचरा उचलला जात नाही. सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांचे त्याकडे तक्रार करुन ही त्याची दखल घेतली जात नाही. डोंबिवली पश्चिमे बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते. त्यासाठी नो पार्किंग झोन तयार करण्याची गरज आहे. याशिवाय आमदार खासदारांच्या निधीतून सुरु असलेल्या विकास कामावर अभियंत्याचे लक्ष नसल्याने कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखली जात नाही. याचाही गांभीर्याने विचार करावा अशी मागणी धात्रक यांनी केली आहे. दरम्यान या मनपाच्या या हलगर्जीपणामुळे याचा नाहक नागरिकांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे या संदर्भात भाजपाचे माजी नगरसेवक धात्रक यांनी याबाबतचे खडेबोल पालिका उपायुक्तांना सुनावले आहेत.






