डोंबिवली पुन्हा हादरली, सोनार पाडामधील एका कंपनीला आग, परिसरात धुळाचे लोळ
डोंबिवली एमआयडीसीमध्ये आगीचे सत्र सुरुच आहे. डोंबिवलीमधील सोनार पाडा एमआयडीसीमधील एका कंपनीत स्फोट झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी फेज-२मधील एका कंपनीत हा स्फोट झालाय. या आगीनंतर परिसरात धुळाचे लोळ पसरले आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत.
डोंबिवलीमधील स्फोट प्रकरण थांबनाता दिसत नाही. काही दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना घडल्यानंतर आज (7 जुलै) पुन्हा एकदा कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील फेज २ मध्ये भीषण आग लागली आहे. एमआयडीसी परिसरात असलेल्या न्यू ॲग्रो केमिकल या कंपनीला भीषण आग लागली आहे. या कंपनीत कापड प्रिटींगसाठी लागणारे केमिकल बनवण्याचे काम केले जाते.
रविवारी 7 जुलै रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्यानंतर काही मिनिटांतच आग सर्वत्र पसरली. प्राथमिक माहितीनुसार, इलेक्ट्रिक पार्किंग लॉटमुळे ही मोठी आग लागली असावी, असा संशय आहे. ज्याठिकाणी आग लागली तिथे ५० कामगार काम करत होते. सुदैवाने कामगार सुखरूप बाहेर आले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याचदरम्यान डोंबिवली MICS च्या अमुदान केमिकल कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाला होता. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. अन्यथा अजूनही काही लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक आणि प्रशासक यांच्याविरुद्ध कलम ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला असता. तसेच गेल्या महिन्यात डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाईन्स या किटकनाशक बनवणाऱ्या रासायनिक कंपनीत स्फोट झाला होता. आग लागताच इंडो अमाईन्स कंपनीसह लगतच्या मालदे कॅपीसिटर्स कंपनीमधील कर्मचारी तात्काळ कंपनी बाहेर आल्याने मोठी जीवित हानी टळली. दोन्ही कंपन्यांचे आगीत मोठे नुकसान झाले होते.