Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: घरात नेहमीसारखं सगळं सुरू होतं… पण कोपऱ्यात दिसलं असं काही की कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली!

कल्याण पश्चिमेतील गांधारी गावात एका घरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशोक लोखंडे यांच्या घराच्या कोपऱ्यात चक्क कोब्रा नागाची 15 ते 20 पिल्लं आढळून आली. कुटुंबीयांनी घाबरून सर्पमित्राला बोलावले. सर्पमित्र कपिल कारभारी यांनी सर्व पिल्लांना सुरक्षित पकडून जंगलात सोडले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 22, 2026 | 12:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कल्याणमधील घरात कोब्रा नागाची 15-20 पिल्लं आढळली.
  • सर्पमित्राने रेस्क्यू करून सर्व पिल्लांना सुरक्षित जंगलात सोडलं.
  • पावसामुळे बिळांमध्ये पाणी शिरत असल्याने साप बाहेर पडत आहेत
कल्याण: कल्याण पश्चिमेतील गांधारी गावात एका घरात घडलेल्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. घरात नेहमीप्रमाणे दिवस सुरू असताना एका कोपऱ्यात अचानक काहीतरी वळवळताना दिसलं आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. जवळ जाऊन पाहिलं असता तिथे उंदीर किंवा झुरळ नाही तर चक्क विषारी नागाची तब्बल 15 ते 20 पिल्लं आढळून आली. तात्काळ सर्पमित्राला बोलावलं आणि एक एक करीत सर्व सापाची पिल्लं एका बादलीत जमा करून जंगलात सोडून दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

कल्याण पश्चिमेकडील गांधारी गावात अशोक लोखंडे आपल्या कुटुंबासोबत राहतात. तेव्हा त्यांच्या घरात काहीतरी वाळवळताना दिसलं. जवळ जाऊन पाहिलं असता चक्क विषारी नागाची तब्बल 15 ते 20 पिल्लं आढळून आली. हे बघताच लोखंडे कुटुंबीय भयभीत झाले. या नागाच्या पिल्लांचे पालकही परिसरात असावेत. या पिल्लांच्या संपर्कात गेल्यास जीवाला धोका निर्माण उद्भवू शकतो असे त्यांना वाटले. त्यांनी तातडीने सर्पमित्राला नागाच्या पिल्लांविषयी माहिती दिली.

Kalyan Crime: अल्पवयीन मुलीवर घरात घुसून दोन नराधमांनी केला लैंगिक अत्याचार, फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पिल्ले जंगलात सोडली…

माहिती मिळताच कपिल कारभारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची पाहणी करून त्यांनी सर्व पिल्ले सुरक्षितपणे पकडली आणि एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये त्यांना बंद केले. सर्पमित्र कपिल कारभारी यांनी वनविभागाच्या नियमांनुसार ड्रममध्ये भरलेली ही पिल्ले शहरापासून दूर जंगलातील सुरक्षित अधिवासात नेऊन सोडली. नैसर्गिक अधिवासात पिल्ले सोडल्याने त्यांचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होईल, असे सर्पमित्र कपिल कारभारी यांनी सांगितले. गांधारी गाव हे जंगलापासून काही अंतरावर आहे. गावखेडे असल्याने या गावातील परिसरात वारंवार लहान-मोठे, बिनविषारी आणि विषारी साप आढळून येत असल्याच्या घटना घडत असतात. पावसामुळे बिळांमध्ये पाणी शिरत असल्याने साप बाहेर पडत आहेत. अशावेळी घरात, अंगणात किंवा परिसरात साप दिसला तर घाबरून जाऊ नका. तातडीने सर्पमित्रांना संपर्क करा.

सापांबद्दल जनजागृतीची गरज

सापांविषयी जनमानसांत भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. मात्र साप हा शेतकऱ्यांचा मित्र तर आहेच, शिवाय तो निसर्गाचा अविभाज्य घटकही आहे. त्यामुळे त्याचं जतन करणं आवश्यक आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला साप मानवी वस्तीत शिरकाव करण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्राला बोलावून साप पकडून जंगलात सोडण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन कपिल कारभारी यांनी केले आहे.

Navi Mumbai: कोकेन-हायड्रोपोनिक गांजा तस्करी प्रकरणातील सराईत ड्रग माफिया NCBच्या जाळ्यात; PIT-NDPS अंतर्गत अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागाची पिल्लं कुठे आढळली?

    Ans: कल्याण पश्चिमेतील गांधारी गावातील अशोक लोखंडे यांच्या घरात नागाची पिल्लं आढळली.

  • Que: किती नागाची पिल्लं सापडली?

    Ans: घरात 15 ते 20 कोब्रा नागाची पिल्लं आढळून आली.

  • Que: पिल्लांना सुरक्षित कसे केले?

    Ans: सर्पमित्र कपिल कारभारी यांनी पिल्लांना पकडून जंगलातील सुरक्षित अधिवासात सोडले.

Web Title: Kalyan news everything was going on as usual at home but something spotted in the corner left the family absolutely shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Cobra Snake
  • kalyan
  • News
  • thane

संबंधित बातम्या

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
1

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
2

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
3

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
4

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.