
कल्याण-बदलापूर रेल्वेची क्षमता वाढणार; ३१ पूल पूर्ण, चिखलोली स्थानक अंतिम टप्प्यात
एमयूटीपी-३अ अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सुमारे १ हजार ५१० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तिसरी आणि चौथी मार्गिका उपलब्ध झाल्यानंतर कल्याण-बदलापूर विभागात उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या संचालनासाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होणार आहे.
मार्गिका उभारणीच्या कामांतर्गत आतापर्यंत ३१ पूल पूर्ण झाले आहेत. मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या भरावाच्या कामात सुमारे १.६० लाख घनमीटर मातीचा भराव करण्यात आला आहे. एलसी-१ए आणि एमआयडीसी येथील रस्ता उड्डाणपूल (आरओबी) पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
तीन स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तार पूर्ण होणार
विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम पूर्ण झाले आहे. प्लॅटफॉर्मवरील छताचे (सीओपी) कामही पूर्ण करण्यात आले आहे. या स्थानकांवरील आरआरआय आणि इतर संबंधित इमारतींची कामे सुरू आहेत. सिग्नलिंग आणि दूरसंचार विभागासाठी आवश्यक खोल्यांचे काम पूर्ण झाले असून, त्या संबंधित विभागांकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.
उल्हासनगर स्थानकातील दोन पादचारी पुलांचे काम प्रगतिपथावर आहे. दोन्ही एफओबीसाठीचे सर्व २९ गर्डर बसविण्यात आले असून, डेक स्लॅबचे कामही पूर्ण झाले आहे. त्यामुळे एफओबीच्या उर्वरित कामांना आता वेग देण्यात आला आहे.
‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
चिखलोली स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात