Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Live Updates Today: राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार?

Maharashtra Politics: पात्र मतदारांचे नाव प्रारूप यादीत नसल्यास २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत फॉर्म ६ भरून नाव समाविष्ट करता येईल. १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही या कालावधीत अर्ज करता येणार आहे. काही बदल असेल तर फॉर्म ८ भरता येणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 13, 2026 | 06:17 PM
Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून

Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार?

मुंबई : राज्यातील मतदारयादीच्या विशेष सखोल पुनर्रीक्षण (एसआयआर) प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत अद्याप सुमारे १ कोटी ८० लाख मतदारांचे गणना अर्ज जमा झालेले नाहीत. विहित मुदतीत त्यांनी अर्ज न भरल्यास त्यांची नावे प्रारूप मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

एस. चोक्कलिंगम यांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत तर स्थिती आणखी गंभीर आहे. मुंबईतील केवळ ६३ टक्के मतदारांची माहिती डिजिटलाईज झाली आहे. त्यामुळे मुंबईतील सुमारे ३० लाख मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. मतदारांनी स्वतःहून वेबसाईटवर तपासणी करावी, राजकीय पक्षांनीदेखील यादी तपासावी, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी केले आहे. गणना अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट आहे.

The liveblog has ended.
  • 13 Aug 2026 05:58 PM (IST)

    13 Aug 2026 05:58 PM (IST)

    Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर

    ऑस्ट्रेलिया स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १९८ धावांवर सर्वबाद झाला. जेव्हा बांग्लादेशने फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा मिचेल स्टार्कने पहिली विकेट घेतली. या विकेटसह, मिचेल स्टार्क कसोटी क्रिकेटमधील डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे, त्याने ही कामगिरी आंतरराष्ट्रीय डावखुरे खेळाडू दिनी केली.

  • 13 Aug 2026 05:45 PM (IST)

    13 Aug 2026 05:45 PM (IST)

    आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट

    बिहार सरकारने राज्यातील दोन मोठे सुपरस्टार, आकाशदीप आणि मुकेश कुमार यांचा एका भव्य कार्यक्रमात सन्मान केला. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दोन्ही खेळाडूंना डीएसपी पदाची नियुक्तीपत्रे दिली. आता याबाबत एक नवीन बातमी समोर येत आहे.दोन्ही खेळाडूंच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. जर त्यांना बिहार पोलिसात दीर्घकाळ राहायचे असेल, तर त्यांना सरकारची ही अट मान्य करावी लागेल.

  • 13 Aug 2026 05:35 PM (IST)

    13 Aug 2026 05:35 PM (IST)

    अमित भालेराव यांची शेफलर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती; कंपनीकडून मोठी घोषणा

    मोशन टेक्नॉलॉजी कंपनी असलेल्या शेफलर इंडिया लिमिटेडने (BSE: 505790, NSE: SCHAEFFLER) आज अमित भालेराव यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली. ही नियुक्ती १० ऑगस्ट २०२६ पासून प्रभावी झाली आहे. या भूमिकेत अमित भारतातील कंपनीच्या उत्पादन कार्याचे नेतृत्व करतील. तसेच ऑपरेशनल उत्कृष्टता, उत्पादन धोरण, डिजिटल परिवर्तन आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासोबतच, शेफलर इंडियाचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि दीर्घकालीन विकासाचा अजेंडा अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

  • 13 Aug 2026 05:20 PM (IST)

    13 Aug 2026 05:20 PM (IST)

    उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

    मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील उत्तन, चौक, पाली, डोंगरी आणि तारोडी या पाच गावांचे सिटी सर्वेक्षण गेल्या नऊ वर्षांपासून रखडले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या गावांमध्ये पिढ्यान्‌पिढ्या वास्तव्य करणाऱ्या आगरी-कोळी नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर अधिकृत मालकी हक्क प्रस्थापित करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिकांना त्यांच्या पारंपरिक जमिनीपासून वंचित करून शहराबाहेर जाण्यास भाग पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी गुरुवारी महापालिकेच्या महासभेत केला.

  • 13 Aug 2026 05:00 PM (IST)

    13 Aug 2026 05:00 PM (IST)

    २०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

    शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सलग पाचव्या दिवशी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय देताना आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन निर्णय घेतल्याचा दावा सिब्बल यांनी केला.

  • 13 Aug 2026 04:52 PM (IST)

    13 Aug 2026 04:52 PM (IST)

    आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट

    बिहार सरकारने राज्यातील दोन मोठे सुपरस्टार, आकाशदीप आणि मुकेश कुमार यांचा एका भव्य कार्यक्रमात सन्मान केला. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दोन्ही खेळाडूंना डीएसपी पदाची नियुक्तीपत्रे दिली. आता याबाबत एक नवीन बातमी समोर येत आहे.दोन्ही खेळाडूंच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. जर त्यांना बिहार पोलिसात दीर्घकाळ राहायचे असेल, तर त्यांना सरकारची ही अट मान्य करावी लागेल.

  • 13 Aug 2026 04:40 PM (IST)

    13 Aug 2026 04:40 PM (IST)

    ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास

    मिरा-भाईंदर महापालिकेच्या ५०० कोटी रुपयांच्या कर्जप्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कर्जप्रस्तावाबाबत आरोप केल्यानंतर नगरविकास विभागाने महापालिकेकडे सविस्तर माहिती मागवली आहे.

  • 13 Aug 2026 04:30 PM (IST)

    13 Aug 2026 04:30 PM (IST)

    बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स

    आपला शेजारी देश बांगलादेश (Bangladesh) सध्या एका अत्यंत अभूतपूर्व आणि भीषण ऊर्जा संकटाच्या विळख्यात सापडला आहे. देशात विजेची मागणी आणि उपलब्ध पुरवठा यामधील तफावत इतकी वाढली आहे की, सामान्य नागरिकांपासून ते व्यापारी वर्गापर्यंत सर्वांनाच तासनतास अंधारात राहावे लागत आहे. या वाढत्या लोडशेडिंगवर आणि ऊर्जा संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी बांगलादेशच्या तारिक रहमान सरकारने देशात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशातील विजेचा वापर तातडीने कमी करण्यासाठी बांगलादेश सरकारने संपूर्ण देशात रात्री ८ वाजल्यानंतर सर्व शॉपिंग मॉल्स, बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्याचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

  • 13 Aug 2026 04:20 PM (IST)

    13 Aug 2026 04:20 PM (IST)

    युरोपच्या आकाशात अद्भुत खगोलीय नजारा; सूर्यग्रहणाने लाखो लोक मंत्रमुग्ध

    चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आल्याने काही भागांत सूर्याचा प्रकाश काही काळ झाकोळला गेला. पूर्ण ग्रहणाच्या पट्ट्यात काही मिनिटांसाठी दिवसाच्या वेळेत अंधारासारखी परिस्थिती निर्माण झाली. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतरावरून विशेष ग्रहण चष्म्यांचा वापर केला.सूर्यग्रहणाच्या काळात आकाशातील बदल पाहण्यासाठी खगोलप्रेमी मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

  • 13 Aug 2026 04:07 PM (IST)

    13 Aug 2026 04:07 PM (IST)

    डिलिव्हरी पार्टनर्ससाठी मोठी खुशखबर! ₹99 च्या बचतीतून मिळणार पेन्शन

    आज अनेक तरुण नोकरीपेक्षा वेगळा मार्ग निवडताना दिसतात. कुणी दिवसभर डिलिव्हरी करतो, कुणी कॅब चालवतो, तर कुणी घरपोच दुरुस्ती, ब्युटी किंवा इतर सेवा देतो. कामाची मोकळीक मिळते, पण या प्रकारच्या रोजगारात एक मोठी अडचण असते. उद्याचा आर्थिक आधार. नियमित पगार, कंपनीची पेन्शन किंवा निवृत्तीची ठरलेली सोय अनेकांना मिळत नाही. आता याच वर्गासाठी पेन्शनची दारे उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .

  • 13 Aug 2026 04:00 PM (IST)

    13 Aug 2026 04:00 PM (IST)

    कोकणातील आमसभेत राडा; ठाकरे शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

    कोकणात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भरसभेत भिडले. या राड्यामुळे सभेतील वातावरण काही वेळेसाठी तणावपूर्ण झाले होते.

  • 13 Aug 2026 03:50 PM (IST)

    13 Aug 2026 03:50 PM (IST)

    Nashik मधील पेगलवाडीतील रस्त्यांची Aaditya Thackeray यांच्याकडून पाहणी

    नाशिकमधील पेगलवाडी परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेची आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. रस्त्यांच्या समस्यांबाबत त्यांनी संबंधित परिस्थितीची माहिती घेतली, विद्यार्थी व्यथा मांडतायत, शिक्षणमंत्र्यांचं लक्ष आहे का असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.

  • 13 Aug 2026 03:40 PM (IST)

    13 Aug 2026 03:40 PM (IST)

    Shiv Sena: कपिल सिब्बल यांच्याकडून पुन्हा निवडणूक आयोगावर 'फायरिंग', न्यायालयात काय घडलं?

    Shiv Sena Supreme Court Hearing: एकनाथ शिंदे यांना दिलेले शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रता याचिकेवरील निकालाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

  • 13 Aug 2026 03:30 PM (IST)

    13 Aug 2026 03:30 PM (IST)

    Sansad Monsoon Session: संसदीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस

    -'चर्चेच्या दृष्टीने यावेळेचं सत्र चांगलं नाही राहिलं'

    -विरोधकांच्या गोंधळामुळे चर्चा झाली नाही- रिजिजू

    -राज्यसभेत 39 टक्केच काम झालं- रिजिजू

  • 13 Aug 2026 03:20 PM (IST)

    13 Aug 2026 03:20 PM (IST)

    Bhiwandi: भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

    मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.ज्यामुळे येथील वाहतूक कोंडी चा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. 2018 पासून भिवंडी ठाणे बायपास रस्त्याचे आठ पदरीकरण काम सुरू असून हे काम आजही संथगतीने सुरू असल्याने असंख्य उड्डाणपूलांची काम व काँक्रिटीकरण रेंगाळलेली आहेत.

  • 13 Aug 2026 03:10 PM (IST)

    13 Aug 2026 03:10 PM (IST)

    Washim: कारंजा शहरात फळ विक्रेत्यावर भटक्या कुत्र्यांनी चढवला अचानक हल्ला

    वाशिमच्या कारंजा शहरात भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः हैदोस पाहायला मिळालाय. भर चौकात फळ विक्रेत्यावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवत अंगावर तुटून पडत जागोजागी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडलीय जखमी झालेल्या फळ विक्रेत्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

  • 13 Aug 2026 03:00 PM (IST)

    13 Aug 2026 03:00 PM (IST)

    Golden Dome: अमेरिकेभोवती उभारणार 185 अब्ज डॉलर्सची अभेद्य सुरक्षेची भिंत; उद्योजक आणि गुंतवणूकदारांची मोठी मोर्चेबांधणी

    जागतिक स्तरावर सातत्याने वाढणारे भू-राजकीय तणाव आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वाढता धोका लक्षात घेता, अमेरिकेने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला एका नव्या आणि अभेद्य पातळीवर नेण्याची तयारी पूर्ण केली आहे. अमेरिकन (America) सरकारने आपल्या प्रस्तावित १८५ अब्ज डॉलर्सच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘गोल्डन डोम’ (Golden Dome) क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या विकासाला गती देण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल उचलले आहे. या प्रकल्पात देशातील अग्रगण्य संरक्षण कंपन्या, व्यावसायिक तंत्रज्ञान स्टार्ट-अप्स, व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदार आणि अग्रगण्य संशोधन संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने एका खास डिजिटल पोर्टलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

  • 13 Aug 2026 02:50 PM (IST)

    13 Aug 2026 02:50 PM (IST)

    Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

    Manjar Movie: मराठी सिनेसृष्टीत आणखी एका भन्नाट कॉमेडी चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ‘मांजर’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, पोस्टरमधील गोंधळाने चित्रपटाबद्दलचं कुतूहल आणखी वाढवलं आहे. तीन मित्र, घरभर पसरलेला पसारा आणि त्यांचं बेफिकीर जगणं अशी या पोस्टरची झलक आहे. मात्र, या सगळ्या गोंधळाचा आणि ‘मांजर’ या नावाचा नेमका संबंध काय, याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.

  • 13 Aug 2026 02:45 PM (IST)

    13 Aug 2026 02:45 PM (IST)

    Mitchell Starc चा ऐतिहासिक विक्रम! हेराथला मागे टाकत बनला टेस्ट क्रिकेटचा नंबर-1 लेफ्ट-आर्म बॉलर

    ऑस्ट्रेलिया स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १९८ धावांवर सर्वबाद झाला. जेव्हा बांग्लादेशने फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा मिचेल स्टार्कने पहिली विकेट घेतली. या विकेटसह, मिचेल स्टार्क कसोटी क्रिकेटमधील डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे, त्याने ही कामगिरी आंतरराष्ट्रीय डावखुरे खेळाडू दिनी केली.

  • 13 Aug 2026 02:40 PM (IST)

    13 Aug 2026 02:40 PM (IST)

    Defence Jobs: सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ तारखेला होणार एनडीए परीक्षा!

    Defence Jobs: भारतीय भूदल सेना, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) आणि नॅशनल अकादमी (NA) परीक्षा (II) २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाच्या वतीने जारी केलेल्या कार्यक्रमामानुसार, एनडीए आणि एनए परीक्षा १३ सिप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल.

  • 13 Aug 2026 02:30 PM (IST)

    13 Aug 2026 02:30 PM (IST)

    Airtel Recharge Hike: एअरटेलच्या रिचार्जमध्ये मोठा बदल; ‘हे’ प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांचा खर्च वाढणार

    Airtel prepaid Plans: मोबाईल रिचार्जचा खर्च आधीच अनेकांच्या बजेटमध्ये महत्त्वाचा भाग बनला आहे. अशातच एअरटेलच्या ग्राहकांसाठी एक नवा बदल समोर आला आहे. कंपनीने आपल्या काही लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे कमी पैशात रोजचा इंटरनेट डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना आता दुसरा पर्याय निवडावा लागणार आहे. विशेष म्हणजे, बंद झालेल्या योजनांमध्ये २९९ रुपयांचा रिचार्ज अनेकांसाठी सोयीचा होता. हा पर्याय हटवल्यानंतर रोज डेटा हवा असलेल्या ग्राहकांना तुलनेने जास्त किंमत मोजावी लागू शकते.

  • 13 Aug 2026 02:25 PM (IST)

    13 Aug 2026 02:25 PM (IST)

    तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral

    रस्त्यावर गाडी चालवण्याआधी त्याचे लायसंस मिळवणे फार महत्त्वाचे असते. फक्त भारतातच नाही तर इतर देशांतही गाडी चालवण्यासाठी ऑफीशियल लायसंस म्हणजेच परवान्याची गरज लागते. यासाठी एक टेस्ट द्यावी लागते. ड्राईव्ह लायसंसची टेस्ट काहीशी कठीण मानली जाते पण अलिकडे समोर आलेल्या व्हिडिओत मात्र भलताच प्रकार घडताना दिसून आला. 

    credit - social media and instagram

  • 13 Aug 2026 02:20 PM (IST)

    13 Aug 2026 02:20 PM (IST)

    Satara Water Crisis: विहिरीत उतरले मळीमिश्रित पाणी; जावळीतील नेवेकरवाडीत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

    Satara News: नेवेकरवाडी (ता. जावळी) येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत लगतच्या ओढ्यातून दूषित पाण्याचा पाझर होत असल्याने ग्रामस्थासह महिलांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागत आहे. मळीमिश्रित पाणी संबंधित ओढ्यात सोडले जात असल्यानेच विहिरीतील पाणी दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून दोन दिवसात हा प्रश्न न सोडवल्यास शिवसेनेकडून अधिकार्यांना दूषित पाणी पाजण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

  • 13 Aug 2026 02:15 PM (IST)

    13 Aug 2026 02:15 PM (IST)

    Satara Water Crisis: विहिरीत उतरले मळीमिश्रित पाणी; जावळीतील नेवेकरवाडीत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

    Satara News: नेवेकरवाडी (ता. जावळी) येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत लगतच्या ओढ्यातून दूषित पाण्याचा पाझर होत असल्याने ग्रामस्थासह महिलांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागत आहे. मळीमिश्रित पाणी संबंधित ओढ्यात सोडले जात असल्यानेच विहिरीतील पाणी दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून दोन दिवसात हा प्रश्न न सोडवल्यास शिवसेनेकडून अधिकार्यांना दूषित पाणी पाजण्याचा इशारा देण्यात आला आहे. करंदोशी व नेवेकरवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत असून त्यापैकी नेवेकरवाडी साठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. ही विहीर ज्या ओढ्यालगत आहे. या विहिरीला पाणी वाढण्यासाठी आडवे बोअर मारले आहेत हे बोअर ओढ्याच्या दिशेने आहेत व याच पाईपमधून ओढ्यातील दूषित पाणी विहिरीत येते. त्यामुळे विहिरीतील पाणी पूर्णपणे काळे पडले असून त्याला मळीचा वास देखील येत आहे.

  • 13 Aug 2026 02:10 PM (IST)

    13 Aug 2026 02:10 PM (IST)

    IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया हरली तरी Gautam Gambhir यांची खुर्ची कायम? BCCI चा मोठा निर्णय

    श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेला अवघे दोन दिवस उरले आहेत. १५ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या दोन सामन्यांची कसोटी मालिका केवळ भारतीय संघासाठीच नव्हे, तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठीही एक मोठे आव्हान आहे. २०२४ मध्ये नियुक्ती झाल्यापासून गंभीर यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु कसोटी क्रिकेटमधील त्यांच्या कामगिरीवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे, कारण त्यांच्याच कार्यकाळात भारताला २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३-० आणि गेल्या वर्षीच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-० असा व्हाईटवॉश मिळाला होता. परंतु, वृत्तांनुसार, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचा निकाल काहीही लागला तरी गंभीर आपले पद कायम ठेवतील.

  • 13 Aug 2026 02:05 PM (IST)

    13 Aug 2026 02:05 PM (IST)

    Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी

    Airtel IPTV Independence Day Watchlist: स्वातंत्र्यदिन म्हणजे फक्त ध्वजवंदन, देशभक्तीची गाणी आणि सुट्टी एवढाच विषय नाही. या दिवसामागे असलेल्या संघर्षाची, त्यागाची आणि देशासाठी उभे राहिलेल्या असंख्य माणसांची आठवण करण्याची ही वेळ असते. यंदा घरबसल्या अशाच काही प्रेरणादायी कथा पाहण्याची संधी एअरटेल आयपीटीव्हीने उपलब्ध करून दिली आहे.

    वाचा सविस्तर : Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी
  • 13 Aug 2026 02:01 PM (IST)

    13 Aug 2026 02:01 PM (IST)

    Air India Pilot : २४ तासांत वैमानिकाचा धुमाकूळ! कॉकपिटमध्ये क्रूसोबत वाद, विमानात गोंधळ अन् डोप टेस्टमध्ये गांजा पॉझिटिव्ह

    ४ ऑगस्ट रोजी फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-२३७९ विमानाच्या प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या विमानाला अचानक हवेच्या तीव्र झंझावाताचा सामना करावा लागला आणि ते ३०० फूट खाली कोसळले. या अपघातात २० प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्यांसह एकूण २४ जण जखमी झाले. पायलट-इन-कमांडचे कॉकपिटमधील बेशिस्त वर्तन, क्रूसोबतचा त्याचा वाद आणि त्याची गांजा चाचणी पॉझिटिव्ह आल्याने भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. घटनेच्या २४ तास आधीपासून कॉकपिट आणि क्रू यांच्यात तणाव वाढत होता.

  • 13 Aug 2026 01:55 PM (IST)

    13 Aug 2026 01:55 PM (IST)

    चाकणमधील उद्योजक आक्रमक; 15 ते 30 दिवसांत एमआयडीसीतील रस्ते दुरुस्तीची मागणी

    चाकण एमआयडीसीतील जवळपास वीस लघुउद्योगांनी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांना कंटाळून आपला उद्योग स्थलांतरीत करण्याची तयारी केली आहे. येथील उद्योजक आणि त्यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन पत्रकार परिषदेत येथील दुरवस्थेबाबत आक्रमक भुमिका मांडली. मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे १५ ते ३० दिवसांत बुजवावेत, रस्तेनिहाय कामाचे वेळापत्रक जाहीर करावे, ‘चाकण रोड सेल’ स्थापन करून तक्रारींसाठी एक खिडकी व्यवस्था करावी, अतिक्रमणे हटवावीत आणि ट्रकसाठी स्वतंत्र टर्मिनल उभारावेत, अशी मागणी उद्योग प्रतिनिधींनी केली.

  • 13 Aug 2026 01:45 PM (IST)

    13 Aug 2026 01:45 PM (IST)

    50 मैल अंतरावर थरार! टेक्सासमध्ये लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले

    अमेरिकेतून (America) एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. टेक्सास (Texas) राज्यातील मध्य भागातील बेल काउंटी (Bell County) परिसरात अमेरिकन सैन्याचे अतिशय शक्तिशाली मानले जाणारे ‘AH-64 अपाचे’ (Apache) अटॅक हेलिकॉप्टर भीषण अपघाताचा बळी ठरले आहे. सालाडो (Salado) जवळील एका मोकळ्या शेतात हे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्दैवी घटनेत हेलिकॉप्टर चालवणाऱ्या दोन्ही वैमानिक सैनिकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण अमेरिकन सैन्यात आणि फोर्ट हूड लष्करी तळावर प्रचंड शोकाकुल वातावरण पसरले आहे.

  • 13 Aug 2026 01:35 PM (IST)

    13 Aug 2026 01:35 PM (IST)

    गृहमंत्र्यांच्या निवेदनाला विरोधकांचा नकार; थेट राजीनाम्याच्या मागणीने संसदेचा शेवटचा दिवसही वादळी

    गेल्या महिन्यात २० जुलै रोजी सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची आज (१३ ऑगस्ट, २०२६) सांगता होणार आहे. जवळपास २५ दिवस चाललेल्या या अधिवेशात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक मुद्द्यावरील मतभेद अगदी स्पष्टपणे दिसून आले. २० जुलै 2026 रोजी जंतरमंतर आणि संसद मार्गावर झालेल्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उत्तरे देण्याची मागणी लावून धरली. पण अमित शाह सभागृहात न आल्याने विरोधी पक्षांकडून होणाऱ्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आला.

  • 13 Aug 2026 01:25 PM (IST)

    13 Aug 2026 01:25 PM (IST)

    महापालिकेच्या नामकरण प्रस्तावांना मराठी एकीकरण समितीचा विरोध

    मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेतील विषयपत्रिकेवरील प्रकरण क्रमांक ५० अंतर्गत रस्ते, चौक आणि वास्तूंच्या प्रस्तावित नामकरणावर मराठी एकीकरण समितीने तीव्र हरकत नोंदवली आहे. समितीचे गोवर्धन सखाराम देशमुख यांनी महापालिका आयुक्त आणि महापौर यांना निवेदन देत काही प्रस्तावित नावे रद्द करण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या नामकरण प्रस्तावातील अ.क्र. ८ वरील ‘श्री गुरु जम्भेश्वर चौक’ आणि अ.क्र. ९ वरील ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ या नावांवर समितीने आक्षेप घेतला आहे. ही नावे स्थानिक इतिहास व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी संबंधित नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.

  • 13 Aug 2026 01:20 PM (IST)

    13 Aug 2026 01:20 PM (IST)

    स्वातंत्र्यलढ्याला वेग! पाकिस्तानी सैन्यावर बलुच विद्रोही संघटनांचा मोठा प्रहार

    दक्षिण आशियातील राजकीय आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील बनलेल्या बलुचिस्तान  आणि सिंध प्रांतात पुन्हा एकदा हिंसाचाराचा मोठा भडका उडाला आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकारच्या धोरणांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या बलुच बंडखोर संघटनांनी आता आपले हल्ले अधिक तीव्र केले असून, थेट पाकिस्तानी लष्कर आणि सरकारी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. बलुच रिपब्लिकन गार्ड्स (BRG) आणि युनायटेड बलुच आर्मी (UBA) या दोन प्रमुख सशस्त्र संघटनांनी बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील वेगवेगळ्या भागात झालेल्या मालिकास्फोट आणि हल्ल्यांची अधिकृत जबाबदारी स्वीकारली आहे.

  • 13 Aug 2026 01:15 PM (IST)

    13 Aug 2026 01:15 PM (IST)

    तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करून सर्टिफिकेट कसे मिळवायचे?

    ‘विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा.’ ही ओळ प्रत्येक भारतीयाच्या आन, बान आणि शानचे प्रतीक आहे. भारताच्या संविधान सभेने २२ जुलै १९४७ रोजी तिरंग्याला स्वतंत्र भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारले होते. हा दिवस भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि सुवर्णदिन म्हणून नोंदवला गेला आहे. राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे हे आपल्या सर्वांचे परम कर्तव्य आहे आणि हाच मान-सन्मान जन-जनंपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

  • 13 Aug 2026 01:08 PM (IST)

    13 Aug 2026 01:08 PM (IST)

    विहिरीत उतरले मळीमिश्रित पाणी; जावळीतील नेवेकरवाडीत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

    नेवेकरवाडी (ता. जावळी) येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीत लगतच्या ओढ्यातून दूषित पाण्याचा पाझर होत असल्याने ग्रामस्थासह महिलांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागत आहे. मळीमिश्रित पाणी संबंधित ओढ्यात सोडले जात असल्यानेच विहिरीतील पाणी दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून दोन दिवसात हा प्रश्न न सोडवल्यास शिवसेनेकडून अधिकार्यांना दूषित पाणी पाजण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • 13 Aug 2026 01:02 PM (IST)

    13 Aug 2026 01:02 PM (IST)

    धनेगाव पेट्रोल पंपावरील खूनप्रकरणी मोठी अपडेट

    धनेगाव येथील पेट्रोल पंपावर झालेल्या इंदरजितसिंघ बलजितसिंघ बावरी यांच्या खून प्रकरणातील सहावा फरार आरोपी अजय ऊर्फ अज्जू महेंद्र बिगानिया (वय ३२, रा. वाल्मिकी नगर, देगलूर नाका, नांदेड) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गोवर्धन घाट परिसरात सापळा रचून ११ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. ८ ऑगस्ट रोजी इंदरजितसिंघ बावरी हे मित्रासोबत धनेगाव येथील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरावासावी गेले होते. यावेळी पूर्वीच्या बिगानिया, किन्ना परदेशी व त्यांच्या साथीदारांनी कट रचून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खंजराने वार झाल्याने बावरी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 13 Aug 2026 12:48 PM (IST)

    13 Aug 2026 12:48 PM (IST)

    धर्मांतराच्या आरोपप्रकरणी ब्रिटिश धर्मगुरूला अटकपूर्व जामीन

    कीर्तनाच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात आरोपी ब्रिटीश धर्मगुरू पंकज जेम्स देवनूर याला एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि हमी रकमेवर पुणे सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

  • 13 Aug 2026 12:36 PM (IST)

    13 Aug 2026 12:36 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या श्वानांची दहशत

    पिंपरी-चिंचवड शहर एकीकडे 'स्मार्ट आणि मेट्रो सिटी'च्या दिशेने वेगाने वाटचाल करत असताना, दुसरीकडे मात्र मोकाट व भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येने शहरवासीय कमालीचे त्रस्त झाले आहेत. शहरात सध्या अंदाजे १ लाखाच्या आसपास भटके श्वान असून, त्यांच्या हल्ल्यांत नागरिक आणि लहान मुले गंभीर जखमी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. श्वानांच्या या दहशतीमुळे बालके, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मोकाट श्वानांवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्बिजीकरण (नसबंदी) शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु, प्रत्यक्षात शहरातील भटक्या श्वानांची संख्या घटण्याऐवजी झपाट्याने वाढतच असल्याने पालिकेच्या कारभारावर आणि पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली जात आहे.
  • 13 Aug 2026 12:24 PM (IST)

    13 Aug 2026 12:24 PM (IST)

    हुंड्यासाठी छळ, विवाहितेची आत्महत्या

    छळाला कंटालून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना फुरसुंगीत घडली. शारिरिक आणि मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पतीला अटक करण्यात आली असून, सासूसह दीराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या अमोल तेलंग (वय २५, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन अमोल ज्ञानोबा तेलंग (वय २८, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) याला अटक केली आहे. याप्रकरणी सासू, तसेच दीराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संभाजी वडनमवार (वय ५५, रा. इस्लामपूर, ता. किनवट, जि. नांदेड) यांनी फुरसुंगी पोलिसांत तक्रार दिली आहे.

  • 13 Aug 2026 12:12 PM (IST)

    13 Aug 2026 12:12 PM (IST)

    विद्यार्थी हक्क समितीचे समाज कल्याण आयुक्तालयासमोर ठिय्या

    अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, शासकीय वसतिगृहांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समितीने बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. शहरातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत असून, मागण्या मान्य न झाल्यास अन्नत्याग आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पात्र असूनही तांत्रिक कारणांमुळे शिष्यवृत्ती व विविध योजनांचे अर्ज नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या त्रुटी दूर करून त्यांच्या खात्यावर निधी तातडीने जमा करावा, अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे. महाडीबीटीवर शिष्यवृत्ती मंजूर असतानाही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची चौकशी करून विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क परत मिळवून द्यावे, अशीही मागणी आहे.
  • 13 Aug 2026 11:50 AM (IST)

    13 Aug 2026 11:50 AM (IST)

    अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; तब्बल 10.74 कोटींची ‘अशी’ झाली फसवणूक

    पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला तुमचे बँक खाते एका गुन्ह्यात पैसे घेण्यासाठी वापरण्यात आले असून, याबाबत तुम्हाला अटक होऊ शकते. अटक टाळण्यासाठी म्हणून तब्बल १० कोटी ७४ लाख रुपये पाठवण्यास भाग पाडून फसवणूक करणाऱ्या रिलस्टार तसेच या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ‘सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठाला धमकावले होते.

  • 13 Aug 2026 11:45 AM (IST)

    13 Aug 2026 11:45 AM (IST)

    शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा ताण होणार कमी! अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षकेत्तर पदांची भरती; पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी

    राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः तसेच पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला. शासनाने कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित पदांसाठी पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

  • 13 Aug 2026 11:35 AM (IST)

    13 Aug 2026 11:35 AM (IST)

    हरवलेली वस्तू शोधणं झालं सोपं! Google ने आणला Pixel Tag, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

    गुगल पिक्सेल टॅगला कंपनीचा पहिला ब्लूटूथ ट्रॅकरच्या रुपात भारतात लाँच करण्यात आले आहे. नवीन पिक्सेल टॅग भारतासह दूसऱ्या देशांत देखील ॲपल एअर टॅगला टक्कर देणार आहे. कंपनीच्या मते, पिक्सेल टॅगची विक्रि भारतात यावर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांत सुरु करण्यात येईल. कंपनीने या नव्या डिव्हाईसची किंमत आणि याच्या फिचर्सविषयी आधीच माहिती शेअर केली होती. भारतात गुगल पिक्सेल टॅगला एक पीस आणि चार पॅकमध्ये उपलब्ध केले जाईल. याचा आकार हा Pebble Shape च्या डिजाईनचा आहे. डिव्हाईसच्या फ्रंटवर गुगल ब्रँडिंगसह एक एलईडी इंडिकेटर देखील देण्यात आलं आहे.

  • 13 Aug 2026 11:20 AM (IST)

    13 Aug 2026 11:20 AM (IST)

    एका निर्णयातून वाचू शकतात 8 जीव; जाणून घ्या ‘जागतिक अवयव दान दिना’चे महत्त्व अन् वास्तव

    मानवी जीवन हे निसर्गाने दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहे. मात्र, गंभीर आजार किंवा अवयव निकामी झाल्यामुळे दरवर्षी जगभरात लाखो लोक मृत्यूच्या छायेत जगतात. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने दिलेले अवयवदान हे रुग्णासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी साक्षात जीवनदान ठरते. अवयव दान हे केवळ एक वैद्यकीय कार्य नसून माणुसकीचे आणि नि:स्वार्थ सेवेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘जागतिक अवयव दान दिन’ (World Organ Donation Day) म्हणून साजरा केला जातो.

  • 13 Aug 2026 11:15 AM (IST)

    13 Aug 2026 11:15 AM (IST)

    24 व्या हफ्त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम पूर्ण, अन्यथा सरकार 6000 रक्कम ठेवेल रोखून

    पीएम किसान योजनेशी संबंधित एक मोठे अपडेट आले आहे. आता 24 हप्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी एक गोष्ट करणे अत्यंत गरजेचे झाले आहे, अन्यथा त्यांना पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता मिळणार नाही. अनेक राज्यांमध्ये, शेतकऱ्यांना सरकारी खतांच्या दुकानात प्रवेश करण्यासाठी शेतकरी ओळखपत्र किंवा किसान आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ आता तुम्ही कुठूनही खत खरेदी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा शेतकरी ओळखपत्र दाखवावा लागेल.

     

  • 13 Aug 2026 11:04 AM (IST)

    13 Aug 2026 11:04 AM (IST)

    जामनेर ST डेपोमधून चोरट्यांनी पळवली नवीकोरी बस; वाटेत टायर पंचर अन् डाव फसला!

    महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातून चोरीचे धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. इथे काही चोरांनी राज्य परिवहन सुरक्षेला चकमा देत डेपोतून नवीकार बस पळवली. बसला घेऊन ते तिथून फरार होण्यास यशस्वी झाले पण खरा क्लाइमॅक्स तर पुढे घडला. बस हाती लागताच चोर तिला घेऊन निघाले पण वाटेतच बसचा टायर पंक्टर झाला ज्यामुळे पूर्ण होण्याआधी अर्ध्यातच त्यांचा प्लॅन पूर्णपणे फिसकटला. वाटेतच बसचा टायर पंक्चर झाल्याने चोरांनी बसला एका गावाजवळ सोडले आणि रिकाम्या हाती तिथून पळून गेले.

  • 13 Aug 2026 10:57 AM (IST)

    13 Aug 2026 10:57 AM (IST)

    उलटा पडला डाव! बांग्लादेशी ठरले वरचढ, 29 धावातच ऑस्ट्रेलियाचे 4 गडी बाद, झाली दमछाक

    दोन दशकांहून अधिक काळानंतर ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेची इतकी निराशाजनक सुरुवात होईल, याची बांगलादेशनेच काय तर अगदी जगाच्या कोणत्याही टीमने कधी कल्पनाही केली नसेल. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातील डार्विन येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी, बांगलादेशने दुपारच्या जेवणापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या चार महत्त्वाच्या विकेट्स ७४ धावांत आपल्या खिशात टाकल्या आहेत. बांगलादेशी संघ आपल्या प्रमुख वेगवान गोलंदाजांशिवाय मैदानात उतरला होता. यामुळे अनेकांना वाटत होते की, बांग्लादेशाची कामगिरी निराशाजनक होईल. मात्र हा डाव उलटाच पडला असल्याचं दिसून येत आहे.

  • 13 Aug 2026 10:47 AM (IST)

    13 Aug 2026 10:47 AM (IST)

    ग्रंथांचे महत्त्व कालातीत; श्रीराम वाचनालयात ग्रंथपाल दिन आणि सत्कार सोहळा थाटात संपन्न

    आजच्या काळात ग्रंथाचे व ग्रंथालयाचे महत्व कालातीत आहे. व्यक्तिने जर ग्रंथ वाचनाचे ठरवले तर त्याचे महत्व हे आपोआप कळते. ग्रंथ वाचनातून व्यक्ति विद्वान होतो, असे प्रतिपादन श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका व पी.एच.डी. मार्गदर्शक डॉ. अलका नाचेकर यांनी येथे केले.

  • 13 Aug 2026 10:37 AM (IST)

    13 Aug 2026 10:37 AM (IST)

    ७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ बॉक्स ऑफिसवर हिट

    मराठी सिनेसृष्टीत सध्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. विजू माने दिग्दर्शित या कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची दमदार कमाई सुरू आहे. रिलीजला अवघे ११ दिवस पूर्ण झाले असताना चित्रपटाने २०२६ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या टॉप १० यादीत स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे, या यादीत रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ पहिल्या क्रमांकावर आहे.

  • 13 Aug 2026 10:27 AM (IST)

    13 Aug 2026 10:27 AM (IST)

    ‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगें

    मराठा आरक्षणाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत केलेल्या कथित चुका तातडीने दुरुस्त कराव्यात; अन्यथा आगामी आंदोलनाची तीव्रता सरकारला परवडणार नाही, असा आक्रमक इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी साताऱ्यात दिला.

  • 13 Aug 2026 10:17 AM (IST)

    13 Aug 2026 10:17 AM (IST)

    कोंढव्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय

    स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला. कोंढवा परिसरातील मॅजिस्टीक बिझनेस बी. जी. लोणकर रोडवरील ‘रिफ्रेश स्पा सेंटर’वर ही कारवाई केली असून, याप्रकरणी व्यवस्थापकाला अटक केली. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली.

Web Title: 13 august 2026 live breaking news marathi maharashtra politics sports crime national international news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Internation news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या १७४ प्रवाशांचे विमान हायजॅक झाल्याची भीती; वैमानिकांच्या वादाने उडाला गोंधळ
2

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या १७४ प्रवाशांचे विमान हायजॅक झाल्याची भीती; वैमानिकांच्या वादाने उडाला गोंधळ

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.