Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : मीरा-भाईंदरमध्ये राजकीय नैतिकतेचा ऱ्हास; जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय वादांना प्राधान्य

मीरा-भाईंदर शहरात सध्या सुरू असलेले राजकारण केवळ सत्तासंघर्षापुरते मर्यादित न राहता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या संघर्षांपर्यंत पोहोचले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 25, 2026 | 07:39 PM
Mira Bhayander : मीरा-भाईंदरमध्ये राजकीय नैतिकतेचा ऱ्हास; जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय वादांना प्राधान्य
Follow Us
Close
Follow Us:
  • मीरा-भाईंदरमध्ये राजकीय नैतिकतेचा ऱ्हास;
  • जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय वादांना प्राधान्य
मीरा-भाईंदर / विजय काते :  मीरा-भाईंदर शहरात सध्या सुरू असलेले राजकारण केवळ सत्तासंघर्षापुरते मर्यादित न राहता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या संघर्षांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे राजकीय नेत्यांच्या नैतिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण वाढताना दिसत आहे.पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात कट्टर विरोधक असले तरी एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंगांना मान देण्याची परंपरा होती. वाढदिवस, सामाजिक कार्यक्रम किंवा दुःखद प्रसंगी विरोधी पक्षातील नेतेही सभ्यतेने वागत असत. मात्र, मीरा-भाईंदरमध्ये सध्या घडणाऱ्या घटनांमुळे ही राजकीय संस्कृती लोप पावत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही राजकीय वादाची किनार
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सामाजिक एकोपा आणि उत्सवाचे प्रतीक ठरण्याची अपेक्षा होती. विविध भागांतून आलेले कार्यकर्ते, नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मात्र, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरच राजकीय वाद उफाळून आला. मैदानाबाहेर भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण बनले होते. सुदैवाने परिस्थिती नियंत्रणात राहिली, परंतु या घटनेने शहरातील राजकीय तणाव किती वाढला आहे, याचे स्पष्ट दर्शन घडले.

वादाची पार्श्वभूमी : सोशल मीडियापासून रस्त्यावर
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर येत आहे. एका मुंबईतील युवासैनिकाने भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर हा वाद चिघळला. या पोस्टच्या निषेधार्थ भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात आंदोलन केले. या घटनेनंतर दोन्ही पक्षांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आणि त्याचे पडसाद विविध ठिकाणी उमटू लागले. वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या दिवशी झालेली शाब्दिक चकमक ही त्याच वादाची पुढची पायरी मानली जात आहे.

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
दरम्यान, शहरातील मूलभूत समस्यांकडे मात्र राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे. मीरा-भाईंदरमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई, खड्डेमय रस्ते, वाढती वाहतूक कोंडी, अपुरी नागरी सुविधा अशा अनेक प्रश्नांनी नागरिक हैराण झाले आहेत.महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अजूनही झालेली नाही. नागरिकांना अपेक्षा होती की, निवडून आलेले लोकप्रतिनिधी विकासकामांना प्राधान्य देतील. मात्र, सध्या सुरू असलेल्या राजकीय संघर्षामुळे हे प्रश्न दुय्यम ठरत असल्याचे चित्र आहे.

शहराची प्रतिमा धोक्यात
सततच्या वादांमुळे आणि सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या घटनांमुळे मीरा-भाईंदर शहराची प्रतिमा राज्यभरात मलिन होत असल्याची चर्चा आहे. गुंतवणूक, विकास आणि सामाजिक स्थैर्यासाठी आवश्यक असलेले सकारात्मक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“मीरा-भाईंदर हे शहर राजकीय प्रयोगशाळा बनले आहे का?” असा प्रश्न आता सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. राजकीय पक्षांमधील स्पर्धा लोकशाहीचा भाग असली, तरी ती मर्यादेत राहणे आवश्यक आहे, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

धक्कादायक प्रकार : शासकीय रुग्णालयात १.६५ कोटींची मुदतबाह्य औषधे; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

नागरिकांची मागणी : विकासाला प्राधान्य द्या
शहरातील नागरिकांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. “आम्ही तुम्हाला निवडून दिले ते आमचे प्रश्न सोडवण्यासाठी, एकमेकांशी भांडण्यासाठी नाही,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.राजकीय नेत्यांनी परस्परांतील मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा, वाढता तणाव आणि अस्थिरता यामुळे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

मीरा-भाईंदरमध्ये सध्या दिसणारे राजकारण हे केवळ सत्तासंघर्षाचे नसून, ते नैतिकतेच्या ऱ्हासाचेही द्योतक बनले आहे. राजकीय परंपरा, सभ्यता आणि जनतेप्रती असलेली जबाबदारी यांचा विसर पडत चालल्याचे चित्र आहे.आता गरज आहे ती राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याची. अन्यथा, वाढते वाद आणि संघर्ष यामुळे केवळ शहराचीच नव्हे, तर लोकशाही व्यवस्थेचीही प्रतिमा धोक्यात येऊ शकते.

भिवंडीत आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी! रुग्णवाहिका न मिळाल्याने घरात प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

Web Title: Mira bhayander decline in political ethics in mira bhayander political disputes are given priority over public issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • latest news
  • Marathi News
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Reliance Industries : जुने विक्रम मोडत देशाच्या कॉर्पोरेट जगतात रिलायन्सचा दबदबा! ‘या’साठी ठरली देशातील पहिली कंपनी
1

Reliance Industries : जुने विक्रम मोडत देशाच्या कॉर्पोरेट जगतात रिलायन्सचा दबदबा! ‘या’साठी ठरली देशातील पहिली कंपनी

Europe Tour on Budget: फक्त 50 हजारांत युरोप ट्रिप! बजेटमध्ये फिरता येतील ‘हे’ ५ सुंदर देश; असं करा नियोजन…
2

Europe Tour on Budget: फक्त 50 हजारांत युरोप ट्रिप! बजेटमध्ये फिरता येतील ‘हे’ ५ सुंदर देश; असं करा नियोजन…

Pune News :  पुण्यात ड्रग्ज सप्लायसाठी ‘पोर्टर’ ॲपचा वापर! 21 लाखांच्या एम.डी. सह तिघांना अटक
3

Pune News : पुण्यात ड्रग्ज सप्लायसाठी ‘पोर्टर’ ॲपचा वापर! 21 लाखांच्या एम.डी. सह तिघांना अटक

Ratnagiri News : रस्त्याची चाळण पण प्रशासानाचा मात्र डोळेझाक; गावकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा
4

Ratnagiri News : रस्त्याची चाळण पण प्रशासानाचा मात्र डोळेझाक; गावकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.