Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar Water Crisis : पाणीप्रश्न सोडवण्यासाठी देवच अवतरले!  मिरा-भाईंदर महानगरपालिकेसमोर मनसेचे आगळेवेगळे आंदोलन

Mira Bhayandar Water Crisis : शहरातील तीव्र पाणीटंचाई आणि वारंवार होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात मनसेने मिरा-भाईंदरमध्ये अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. कार्यकर्ते विविध देवतांच्या वेशात महानगरपालिका परिसरात दाखल झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 16, 2026 | 02:23 PM
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी देवच अवतरले! मिरा-भाईंदर महानगरपालिकेसमोर पाणीप्रश्नी मनसेचे आगळेवेगळे आंदोलन

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी देवच अवतरले! मिरा-भाईंदर महानगरपालिकेसमोर पाणीप्रश्नी मनसेचे आगळेवेगळे आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • पाणीप्रश्न सोडवण्यासाठी देवच अवतरले!
  • महानगरपालिकेसमोर पाणीप्रश्नी मनसेचे आगळेवेगळे आंदोलन
  • मनसेने प्रशासनाला पाणीप्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी
विजय काते, मीरा-भाईंदर : शहरातील वाढती पाणीटंचाई आणि वारंवार उद्भवणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असताना, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मिरा-भाईंदरमध्ये आगळेवेगळे आंदोलन छेडले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध देवतांचे वेश परिधान करून महानगरपालिका परिसरात प्रवेश करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना थेट जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी केले. शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक भागांमध्ये तीव्र नाराजी आहे. पाणीपुरवठ्यातील अनियमितता, कमी दाबाने येणारे पाणी, काही भागांमध्ये दिवसेंदिवस वाढणारी टंचाई आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार याविरोधात मनसेने हे अनोखे आंदोलन उभारले. वेळी संदीप राणे यांनी प्रशासन, महापौर आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली. “शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यात प्रशासन, महापौर आणि नगरसेवक पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. अनेक वेळा पाठपुरावा करूनही नागरिकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही,” असे ते म्हणाले.

Mira Bhayandar Case : ‘दोषींना कोणतीही माफी नाही…’, मीरा-भाईंदर अत्याचार प्रकरणावर प्रताप सरनाईक यांची कठोर भूमिका

आंदोलनादरम्यान त्यांनी उपरोधिक शैलीत प्रशासनावर निशाणा साधला. “जेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पाण्याच्या समस्येवर कोणताही ठोस तोडगा काढता येत नाही, तेव्हा आता हा प्रश्न सोडवण्यासाठी देवांनाच अवतार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आज साक्षात देवच मिरा-भाईंदर महानगरपालिकेत नागरिकांच्या वतीने जाब विचारण्यासाठी आले आहेत,” असे वक्तव्य त्यांनी केले.मनसेच्या या अनोख्या आंदोलनामुळे महानगरपालिका परिसरात काही काळ वेगळेच वातावरण निर्माण झाले. देवतांच्या वेशातील कार्यकर्त्यांकडे नागरिक, कर्मचारी आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधले गेले. अनेकांनी या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने त्याची चर्चा शहरभर रंगली.

मनसेने प्रशासनाला पाणीप्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. भविष्यातही नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे. शहरातील नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली असून, अनेक भागांतील नागरिकांना अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. वाढती लोकसंख्या, अपुरी जलसाठा क्षमता, गळती होणाऱ्या जलवाहिन्या, अनधिकृत पाणी जोडण्या आणि नियोजनाचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक बिकट होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

कोणत्या समस्या समोर येत आहेत?

मीरा-भाईंदरमधील अनेक भागांत पाणी कमी दाबाने येणे, काही ठिकाणी एक-दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणे, तर काही भागात पुरेशा वेळेसाठी पाणी उपलब्ध न होणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. उन्हाळा आणि वाढती मागणी यामुळे जलपुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

Mira Bhayandar: गोल्डन चौकी परिसरात अनधिकृत मशिद आणि मंदिरावर कारवाई; परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Web Title: Mns unique protest water shortage mira bhayandar gods costume 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • MNS
  • Water Crisis

संबंधित बातम्या

World Vada Pav Day: वडापावप्रेमींनो पाहिलंत का? ४ किलोचा वडापाव अन् २.५ किलोचा समोसा! मीरा-भाईंदरमध्ये खवय्यांची गर्दी
1

World Vada Pav Day: वडापावप्रेमींनो पाहिलंत का? ४ किलोचा वडापाव अन् २.५ किलोचा समोसा! मीरा-भाईंदरमध्ये खवय्यांची गर्दी

Mira Bhayandar Fire Brigade: अग्निशमन दलाच्या मदतीला ‘फायर फायटिंग ड्रोन’; उंच इमारतींतील आगीवर नियंत्रणाचा नवा प्रयोग
2

Mira Bhayandar Fire Brigade: अग्निशमन दलाच्या मदतीला ‘फायर फायटिंग ड्रोन’; उंच इमारतींतील आगीवर नियंत्रणाचा नवा प्रयोग

Mira Bhayandar News: ‘न्यायालयापेक्षा आमदाराचा आदेश मोठा आहे का?’ उच्च न्यायालयाचा MBMC आयुक्तांना सवाल
3

Mira Bhayandar News: ‘न्यायालयापेक्षा आमदाराचा आदेश मोठा आहे का?’ उच्च न्यायालयाचा MBMC आयुक्तांना सवाल

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत
4

Mira Bhayandar BJP: स्वकीयांमुळेच महासभेत भाजपची कोंडी; नगरसेविका निला सोन्स यांची आक्रमक भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.