Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravindra Chavan : ठाणे-पालघर डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला; परिवर्तन पॅनलसाठी रवींद्र चव्हाण मैदानात

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २७ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या परिवर्तन पॅनलला विजयी करण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या संयुक्त महायुतीकडून ‘छत्री’ या चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2026 | 03:39 PM
ठाणे-पालघर डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला; परिवर्तन पॅनलसाठी रवींद्र चव्हाण मैदानात

ठाणे-पालघर डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला; परिवर्तन पॅनलसाठी रवींद्र चव्हाण मैदानात

Follow Us
Follow Us:
  • ठाणे-पालघर डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला
  • परिवर्तन पॅनलसाठी रवींद्र चव्हाण मैदानात
  • सहकारी बँकेचे महत्त्व
Thane Palghar DCC Bank Election : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सार्वत्रिक निवडणूक २७ जून रोजी होणार असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीने एकत्रितपणे ‘परिवर्तन पॅनल’ उभे केले असून, या पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना आवाहन केले आहे.

रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. सहकार क्षेत्र अधिक मजबूत, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी महायुतीचे वर्चस्व आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पत्रकारांवर संतापले संजय दिना पाटील; ‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन’, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकी

सहकारी बँकेचे महत्त्व

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि विविध लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची आर्थिक संस्था मानली जाते. या बँकेमार्फत शासकीय योजनांचे अनुदान, कर्जवाटप आणि आर्थिक मदत वितरित केली जाते. त्यामुळे बँकेच्या कारभारावर सक्षम नेतृत्व असणे गरजेचे असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

प्रथमच महायुतीचे संयुक्त पॅनल

यंदा प्रथमच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकत्र येत ‘परिवर्तन पॅनल’ उभे केले आहे. या पॅनलची निवडणूक निशाणी ‘छत्री’ आहे.

महायुतीचे प्रमुख उमेदवार

विविध मतदारसंघांतून महायुतीने खालील उमेदवारांना संधी दिली आहे:

हाऊसिंग मतदारसंघ – सीताराम राणे

पतसंस्था मतदारसंघ – प्रभू पाटील

महिला मतदारसंघ – दीपाली पाटील, सुवर्णा पावशे

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ – पांडुरंग बरोरा

ओबीसी मतदारसंघ – हार्दिक राऊत

भटक्या-विमुक्त जमाती मतदारसंघ – राजेंद्र घोलप

विविध कार्यकारी संस्था मतदारसंघ – ज्योती पाटेकर (जव्हार), अनिल गावंड (पालघर), विद्या वेखंडे (शहापूर), संदीप पावडे (विक्रमगड)

मतदारांना आवाहन

महायुतीच्या सर्व उमेदवारांना ‘छत्री’ या निवडणूक चिन्हासमोर मतदान करून विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले. सहकार क्षेत्रातील विकास, पारदर्शकता आणि शेतकरी हितासाठी परिवर्तन पॅनलला पाठिंबा देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या निवडणुकीत महायुतीच्या एकजुटीची मोठी परीक्षा लागणार असून, ठाणे-पालघर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?

Web Title: Ravindra chavan appeals to vote for mahayuti parivartan panel in thane palghar dcc bank election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • palghar
  • Ravindra Chavan
  • thane

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश
2

Vadhvan Port च्या कामांना गती! केंद्रीय सचिवांनी केली प्रत्यक्ष पाहणी; आढावा बैठकीत दिले ‘हे’ निर्देश

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…
3

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित
4

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.