Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभेसाठी ठरला महायुतीचा प्लॅन; 20 ऑगस्टला फुटणार प्रचाराचा नारळ

प्रत्येक दिवशी किमान दोन ते तीन विधानसभा मतदारसंघ कव्हर कऱण्याचा प्रयत्न असेल. हा दौरा जास्तीत जास्त सात ते दहा दिवसांचा असेल. ज्या मतदारसंघात सभा असेल त्या मतदारसंघातील स्थानिक नेते पदाधिकारी सभेमध्ये उपस्थित राहतील.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 09, 2024 | 12:49 PM
सौजन्य- सोशल मीडिया

सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये वेगाने घडामोडी होऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पुरेसे यश न मिळाल्यामुळे आता महायुतीने जोमाने तयारी सुरू केली आहे. अशातच गुरूवारी (8 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महायुती समन्वय समितीची बैठक पार पडली.  या बैठकीतच विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा देखील प्लॅन ठरल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात महायुतीचे समन्वय मेळावे आणि संवाद दौरे आयोजित करण्यात आले आहेत. येत्या 20 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महायुतीची एक सभा घेतली जाणार आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली.

प्रसाद लाड म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण येत्या 20 ऑगस्टपासून राज्यात महायुतीचे समन्वयचे मेळावे आणि संवाद दौरे होणार आहेत. कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन 20 तारखेपासून प्रचाराची सुरुवात होईल. राज्यातील सातही विभागात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तर शेवटची सभा मुंबईत होईल.

प्रत्येक दिवशी किमान दोन ते तीन विधानसभा मतदारसंघ कव्हर कऱण्याचा प्रयत्न असेल. हा दौरा जास्तीत जास्त सात ते दहा दिवसांचा असेल. ज्या मतदारसंघात सभा असेल त्या मतदारसंघातील स्थानिक नेते पदाधिकारी सभेमध्ये उपस्थित राहतील. पाच ते दहा हजाराचा लोकांचा एक मेळावा घेण्याचा प्रयत्न असेल. असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.

जागावाटप संदर्भात प्राथमिक चर्चा झाली. आमच्यामध्ये जागा वाटप संदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहमतीने एक आराखडा तयार केला जाईल. भाजप हा राष्ट्रीय पातळीचवरचा पक्ष असल्याने सर्व निर्णय देवेंद्र फडणवीस आणि कोअर कमिटीच्या मार्फत घेतला जातो. तर केंद्रीय नेतृत्त्वाच्या अंतिम निर्णयानंतर जागा जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी नमुद केले.

Web Title: The grand alliance plan for the assembly was decided

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Mahayuti
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Vidhansabha Elelction 2024

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
3

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
4

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.